माण महसूल प्रशासनाची वाळू व माती माफियांवर बेधडक कारवाई.८२ लाख ७५ हजार ७४० रुपयांचा दंड

१५ वाळू तर ४ माती माफियांवर कारवाई.

आंधळी : माण महसूल प्रशासनाकडून अवैधरित्या माती उत्खनन व वाळू माफीयांवर कारवाई करत  ८२ लाख ७५ हजार ७४० रुपयाचा दंड करण्यात आला असून यामध्ये १५ वाळू तर ४ माती माफीयावर कारवाई करण्यात आली आहे.याबाबत प्रशासनाकडून २४ तासाचा अल्टिमेट देत खुलासा देण्याचे सांगितले होते परंतु यामधील  कोणीच खुलासा न दिल्याने पुढील कारवाई करण्यात आली. 

माण तालुक्यामध्ये अवैधरित्या माती व वाळू उत्कखन होत असल्याच्या बातम्या अनेक प्रसिद्धी माध्यमातून  प्रसिद्ध झाल्या होत्या तर काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या नावाखाली अवैधरित्या उत्खनन करण्यात आले होते. महसूल प्रशासनाकडून रानंद, राजेवाडी तलावातील माती शेतकऱ्यांना उचलण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. परंतु शेतकऱ्याच्या नावाखाली अनेक  वीट भट्टीसाठी अवैधरित्या माती उचलली जात असल्याच्या तक्रार करण्यात  आली होती. तर माणगंगा नदी   पात्रामध्ये ठिकठिकाणी मोठे खड्डे पडून वाळू चोरांकडून रात्री वाळू चोरी केली जात होती.  यावर प्रशासन गप्प का ? असा सवाल सुद्धा सर्वसामान्य जनतेतून होत होता. 

     माण,म्हसवड परिसरातील  महाबळेश्वरवाडी, राऊतवाडी, वरकुटे मलवडी येथील ओड्यावरती व मानगंगा नदीपात्रामध्ये मोठे खड्डे पाडून होत असलेली लाखो ब्रास वाळू चोरी महसूल प्रशासनाची डोकेदुखी ठरत होती. यावर प्रशासनाने कारवाई करत माती व वाळू चोरांना दंड करण्यात आले असून याबाबत संबंधित मंडल अधिकारी व तलाठी यांना दंड वसूल करण्याचे आदेश  देण्यात आले आहेत. 

      माण प्रशासनाकडून करण्यात आलेल्या कारवाईबद्दल जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी,प्रांत अधिकारी उज्वला गाडेकर यांचे तहसीलदार विकास अहिर, मंडलाधिकारी, तलाठी यांचे अभिनंदन करण्यात आले.

आम्हाला जोडण्यासाठी
esataranews.com

स्थानिक बातम्या

आकृतीबंधाचा शासन निर्णय  दोन वर्षांपूर्वीच  निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

आकृतीबंधाचा शासन निर्णय दोन वर्षांपूर्वीच निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

शिक्षण प्रसारक संस्था  करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शिक्षण प्रसारक संस्था करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या  हस्ते संपन्न...

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या हस्ते संपन्न...

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त