साताऱ्यातील चाळकेवाडीत ग्रामस्थांना गॅस्ट्रोची लागण; 40 हून अधिक बाधित
Satara News Team
- Fri 1st Jul 2022 12:09 pm
- बातमी शेयर करा
सातारा : साताऱ्यातील पवनचक्कीचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या चाळकेवाडी येथे गॅस्ट्रोने थैमान घातले असून 40 हून अधिक ग्रामस्थांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे.
त्यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली असून आरोग्य अधिकाऱ्यांकडून घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी केली जात आहे. ठोसेघर येथील ग्रामस्थ गॅस्ट्रोने बाधित झाले असून त्यांच्यावर ठोसेघर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत तर काहींवर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत ओढ्याचे पाणी मिसळल्याने पाणी दूषित झाले होते. त्यातच ग्रामपंचायतींच्या कर्मचाऱ्याने पाण्यात क्लोरोफार्म न मिसळल्याने पाणी दूषित होऊन ही बाधा झाली असल्याचे सांगितले जात आहे.
पावसाळाच्या तोंडावर एवढ्या मोठ्या प्रमाणावर गावकऱ्यांना गॅस्ट्रोची लागण झाल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराचा फटकाही ग्रामस्थांना बसला आहे. कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आलेली आहे.
thoseghar
chalkewadi
स्थानिक बातम्या
कुसुंबी गणात मंत्री शिवेंद्रराजेंचा करिष्मा चालणार
- Fri 1st Jul 2022 12:09 pm
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Fri 1st Jul 2022 12:09 pm
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Fri 1st Jul 2022 12:09 pm
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Fri 1st Jul 2022 12:09 pm
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Fri 1st Jul 2022 12:09 pm
संबंधित बातम्या
-
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Fri 1st Jul 2022 12:09 pm
-
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Fri 1st Jul 2022 12:09 pm
-
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Fri 1st Jul 2022 12:09 pm
-
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धिरेंद्रराजे खर्डेकर यांची राजकीय भेट
- Fri 1st Jul 2022 12:09 pm
-
औंध महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा विषयावर कार्यशाळा संपन्न.
- Fri 1st Jul 2022 12:09 pm
-
फलटण येथील गणेश मूर्ती विटंबनेप्रकरणी संबंधितावर गुन्हा नोंद करा .
- Fri 1st Jul 2022 12:09 pm









