अभय ग्रुप नागठाणे कडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

देशमुखनगर : सातारा तालुक्यातील नागठाणे गावातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले अभय एक्सलंट कला व क्रीडा गणेशोत्सव मंडळ नागठाणे यांच्यामार्फत केंद्र शाळा नागठाणे येथील नवोदित विद्यार्थ्यांना वार मंगळवार दिनांक २५ जून २०२४ रोजी शाळेतील ५० गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. 
                           नागठाणे गावातील भटक्या विमुक्त जाती जमाती मधील विद्यार्थी तसेच गरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप केले. या शैक्षणिक साहित्य किट मध्ये मध्ये पहिली ते चौथी मधील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी दुरेघी अर्धा डझन वह्या , कंपास पेटी ,खडूपेटी ,चित्रकला वही, पेन, पट्टी, पेन्सिल हे साहित्य देण्यात आले. पाचवी ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी फुल स्केल अर्धा डझन वह्या, चित्रकला वही, कंपास पेटी, पेन, पट्टी, पेन्सिल, स्केच पेन, इत्यादी. साहित्याचे वाटप करण्यात आले.
                     या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. खाडे सर यांनी केले प्रस्ताविक माननीय मुख्याध्यापिका सौ. कांताबाई जाधव मॅडम यांनी केले मनोगत मंडळाचे सभासद श्री.विशाल साळुंखे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. मगर मॅडम यांनी केले.
                         या कार्यक्रमावेळी केंद्र शाळा नागठाणे मधील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. संदीप साळुंखे, मुख्याध्यापिका जाधव मॅडम, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच अभय कला व क्रीडा गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते या उपक्रमाचे नागठाणे ग्रामस्थांनी भरभरून कौतुक केले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला