दहिवडी नगरपंचायतची मासिक सर्वसाधारण सभा वादळी

दहिवडी : माण तालुक्याची राजधानी असलेल्या दहिवडी नगरपंचायतीची सर्वसाधारण मासिक सभा वादळी ठरली असून आमदार जयकुमार गोरे यांनी मंजूर करून आणलेल्या वैशिष्ट्यपूर्ण विकासकामांना सत्ताधारी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी विरोध केल्याने विरोधी बाकावरील भाजपाचे नगरसेवक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. विकासकामांना खो घालणाऱ्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा भाजपा नगरसेवक रुपेश मोरे,नीलम जाधव, राणी अवघडे, उज्वला पवार,स्वीकृत नगरसेवक लक्ष्मण जाधव यांनी तीव्र शब्दात व्यक्त केला. दरम्यान सभेच्या सुरुवातीलाच वैशिष्ट्यपूर्ण विकासकामांचा विषय नमूद होताच राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी त्या विकासकामांना खो घालण्याचा निर्णय घेतला.यामुळे संतपलेल्या भाजपच्या नगरसेवकांनी विकासकामात आड येणाऱ्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नगरसेवकांना गावच्या विकासकामाचे घेणेदेणे नसल्याचे म्हणत त्यांना फक्त मलिदा खान्यात रस असल्याचे मत व्यक्त केले. नगरसेवक रुपेश मोरे म्हणाले की, नगरपंचायतीची मासीक सर्वसाधारण सभा आयोजित केली होती.त्या सभेमध्ये आमदार जयकुमार गोरे यांनी जी वैशिष्ट्यपूर्ण कामे मंजूर करून आणली होती.त्या कामाला राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी नामंजुरी देत विरोध केला. अशा विकासकामांना वेळोवेळी विरोध करणे योग्य नाही.राष्ट्रवादीचे नगरसेवक असणाऱ्या प्रभागातही आमदारांनी निधी दिलेला आहे.यामुळे भाजपा नगरसेवकांच्या वतीने राष्ट्रवादी नगरसेवकाचे जाहीर निषेध व्यक्त करतो. नगरसेवक उज्वला पवार म्हणाल्या की, नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती.त्या सभेत वैशिष्ट्यपूर्ण कामाची आमदार गोरे यांच्या प्रयत्नातून विकासकामे मंजूर करून आणण्यात आली होती.परंतु त्या विकासकामांना विरोध करून सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी पूर्णपणे विरोध करत ही विकासकामे थांबवली आहेत.त्या विकासकामांना विरोध करणाऱ्या नगरसेवकांचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो. नगरसेवक नीलम जाधव म्हणाल्या की, आजच्या सर्वसाधारण सभेत आमदार गोरे यांनी मंजूर करून आणलेल्या कामांना जाणून बुजून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी विरोध करत त्या विकास कामांना नामंजुरी दिली आहे.आजपर्यंत सत्ताधारी नगरसेवकांनी एकही रुपयांचे विकास काम मंजूर करून आणले नाही. त्यांना गावच्या विकासात कोणताही रस नाही.फक्त मलिदा खाण्यात व्यस्त असलेल्या राष्ट्रवादी नगरसेवकांचा जाहीर निषेध व्यक्त करतो.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त