आ.गोरे म्हणजे नो ऑर्ग्युमेंट,फैसला ऑन दि स्पॉट!
म्हसवड परिसरातील विजेचा प्रश्न त्वरित मार्गी लावण्याच्या सुचनाSatara News Team
- Fri 20th Jan 2023 12:08 pm
- बातमी शेयर करा

दहिवडी: म्हसवड शहर व ग्रामीण भागात सध्या विजेचा खेळखंडोबा सुरु असुन यामुळे मात्र येथील शेतकऱ्यांचे कृषीपंप चालत नसल्याने पाणी असुनही केवळ विजेअभावी ते पाणी पिकांना देता येत नसल्याची सार्वजनिक व्यथा येथील शेतकऱ्यांनी थेट माण-खटावचे आ. जयकुमार गोरे यांच्याकडे व्यक्त करीत याबाबत योग्य ते उपाययोजना राबवण्याची विनंती केली, बळीराजाची ही विनंती आदेश मानत माणचे आ. गोरे यांनी याबाबत थेट विज कंपणीच्या वरीष्ठांना फोन लावत यावर त्वरीत उपाययोजना करण्याच्या सुचना करीत शेतकऱ्यांना दिलासा दिला.
म्हसवड परिसरातील खासबाग, डावकरे मळा केवटे, दहीवडे वस्ती (नदीपलीकडील) येथील शेतकऱ्यांच्या शेती पंपाच्या वीजचे प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होवु लागला आहे, शेतकऱ्यांच्या विहिरीत पाणी आहे पण ते शेतीला देण्यासाठी विजच उपलब्ध होत नाही या परिसरात विजेचा अक्षरशा खेळखंडोबा झाला आहे. विजच टिकत नसल्याने या भागातील शेतकर्यांची पिके पाण्याअभावी जळु लागली आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवलेली ही पिके केवळ विजेच्या लंपडावामुळे जळु लागल्याची व्यथा सर्वच शेतकऱ्यांची असल्याने शेतकरीवर्ग पुरता हैरान झाला आहे. आपली ही व्यथा मांडायची तर कोणाकडे अनेक गावपुढाऱ्यांकडे शेतकऱ्यांनी याबाबत व्यथा ही मांडली मात्र गावपुढाऱ्यांकडुन हा प्रश्न मार्गी लागलाच नाही यावर थेट सर्जरी करणारा तज्ञच हवा हे जेव्हा येथील शेतकऱ्यांच्या लक्षात आले तेव्हा मग या शेतकऱ्यांनी एकत्र येत येथील माजी नगराध्यक्ष व आ. गोरे यांचे खास असलेले विजय धट यांना भेटुन आपले गार्हाने मांडले. शेतकऱ्यांची ही व्यथा ऐकल्यावर धट यांनी यावर आता सर्वरोग तज्ञ असलेले आ. गोरे याच सर्जनची भेट घेण्याचा सल्ला देत सर्व शेतकऱ्यांना सोबत घेत थेट आ. गोरे यांचे निवासस्थान गाठले. आ. जयकुमार गोरे हे सध्या बोराटवाडी येथील आपल्या निवासस्थानी विश्रांती घेत आहेत, अपघातानंतर डॉक्टरांनी त्यांना सक्तीची विश्रांती घ्यायला लावली आहे, मात्र ज्याला सतत लोकांच्या कामात व्यस्त रहावयाची सवय आहे अशी व्यक्ती कधीच स्वस्थ राहु वा बसु शकत नाही, आपल्यावर एवढा मोठा बाका प्रसंग गुदरला असता अपघाततुन जिवदान मिळाले असल्याचे भान ही या व्यक्तीला नसल्याचे चित्र येथील शेतकर्यांना पहावयास मिळत आहे, डॉक्टरांनी कोणीही भेटु नये अशा सक्त सुचना दिल्या असतानासुध्दा केवळ आपल्या भागातील शेतकरी भेटावयास आल्याचे समजताच आ. गोरे हे व्हिल चेअरवरुन शेतकऱ्यांना भेटण्यासाठी आपल्या कक्षातुन बाहेर आले, आ. गोरे यांची ती अवस्था पाहिल्यावर आपले गार्हाने मांडण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना त्यांची परिस्थिती पाहिल्यावर आपले प्रश्न आता मांडावेत का हाच खरा प्रश्न पडला. मात्र लोकनेता म्हणुन सामान्य जनता ज्यांचा आदर करते त्या आ. गोरेंना एकाचवेळी म्हसवडचे शेतकरी आपल्याला भेटायला आले असावेत पण त्यांचे काहीतरी नक्कीच दुखणे असावे हे नेमके ताडले अन त्यांनी थेट या शेतकऱ्यांनाच बोलते केले तेव्हा एक एक शेतकरी समोर येवुन आपल्या शेतीची व पिकांच्या अवस्थेची कर्म कहानी सांगु लागला, सर्व शेतकऱ्यांच्या समस्या ऐकल्यावर शांत राहतील ते आ. गोरे कुठले? त्यांनी तडक वीज कंपनीच्या दहिवडी, वडुज येथील वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन लावत याबाबत जाब विचारला. या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे बोट दाखवल्याने आ. गोरे यांनी मग थेट वरिष्ठ अधिकारी मुंडे यांना फोन लावत येथील वीज समस्यांमुळे शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणीचा पाढा वाचत यावर त्वरीत उपाययोजना राबवण्याच्या सक्त सुचना केल्या. आ. गोरे यांनीच आता शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न हाती घेतला आहे हे लक्षात येताच संबधित विज कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही म्हसवड येथील विजेचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासनच आ. गोरे यांना दिले.
आ. गोरे यांनी प्रकृती ठिक नसतानाही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी केलेली आक्रमक कृती पाहुन आ. गोरे म्हणजे नो ऑर्ग्युमेंट,फैसला ऑन दि स्पॉट अशाच प्रतिक्रिया आपुसकच शेतकऱ्यांच्या तोंडुन निघाल्या. यावेळी माजी नगराध्यक्ष विजय धट, सुरेश म्हेत्रे, मारुती खासबागे जालिंदर पिसे विजय डावखरे दत्ता डावखरे रावसाहेब खासबागे आनंदा खासबागे इतर शेतकरी बांधव उपस्थित होते.
स्थानिक बातम्या
सातार्यातील कॅफेत १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोलिसांकडून छापे, सहा जणांवर गुन्हा दाखल
- Fri 20th Jan 2023 12:08 pm
स्टेरॉइड’प्रकरणात मुख्य सूत्रधाराला मुंबईतून अटक, सातारा शहर पोलिसांची कारवाई
- Fri 20th Jan 2023 12:08 pm
चुहा नही ये तो शेर है... शिवानी ताई प्रीतम कळसकर..
- Fri 20th Jan 2023 12:08 pm
मारहाण दमदाटी शिवीगाळ प्रकरणी मोगराळे येथील सातजणांविरोधात गुन्हा दाखल.
- Fri 20th Jan 2023 12:08 pm
तब्बल एक कोटी ९१ हजार रुपयांची बनावट विदेशी दारू जप्त करत दारू तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- Fri 20th Jan 2023 12:08 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 20th Jan 2023 12:08 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 20th Jan 2023 12:08 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Fri 20th Jan 2023 12:08 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Fri 20th Jan 2023 12:08 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Fri 20th Jan 2023 12:08 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Fri 20th Jan 2023 12:08 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Fri 20th Jan 2023 12:08 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Fri 20th Jan 2023 12:08 pm