साताऱ्यात जुन्या सिव्हिलच्या जागेवर उभारणार सुसज्ज कॅथलॅब
आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्याला मोठे यश; ना. फडणवीस यांच्याकडून हिरवा कंदीलओमकार सोनावणे
- Tue 2nd Aug 2022 10:47 am
- बातमी शेयर करा
सातारा- दिवसेंदिवस हृदयविकाराच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. हृदयरोगावर आधुनिक उपचार घेण्यासाठी साताऱ्यातील रुग्णांना पुणे, मुंबई अथवा अन्य मोठ्या शहरांमध्ये जावे लागत आहे. मात्र आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे सातारा जिल्ह्यातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीनुसार साताऱ्यातील जुन्या सिव्हिल हॉस्पिटलच्या जागेवर लवकरच सुसज्ज आणि सर्व सोयी- सुविधांनी युक्त कॅथलॅब उभारण्यात येणार आहे. या कामाला उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवला असून पुढील कार्यवाही सुरु झाली आहे.
आ. शिवेंद्रसिंहराजेंनी नुकतीच ना. देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली असून सातारा- जावली मतदारसंघातील विविध विकासकामांच्या संदर्भाने सविस्तर चर्चा केली. यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजेंनी सातारा शहरातील शाही मस्जिदच्या शेजारील जुन्या सिव्हिल हॉस्पिटलच्या जागेत सुसज्ज कॅथलॅब उभारण्यात यावी, अशी मागणी केली तसेच या आशयाचे निवेदनही त्यांनी ना. फडणवीस यांना दिले. ना. फडणवीस यांनी तात्काळ मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कॅथलॅब उभारणीसाठीची पुढील कार्यवाही सुरु करण्याचे आदेश दिले. तसेच सातारा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांना कॅथलॅब उभारणीचा परिपूर्ण प्रस्ताव तातडीने तयार करून राज्य शासनाकडे पाठवण्याच्या सूचना केल्या असून लगेच प्रस्ताव तयार करण्याचे कामही सुरु झाले आहे.
आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीनुसार जुन्या सिव्हिल हॉस्पिटलच्या जागेवर लवकरच सुसज्ज कॅथलॅब उभारली जाणार असून हृदयविकारावर उपचारासाठी आवश्यक असणारी सर्व यंत्रसामुग्री याठिकाणी असणार आहे. कॅथलॅबमधे तपासणी विभाग (ओपीडी), ऑपरेशन थिएटर, रिकव्हरी रूम, आठ ते दहा बेडचा वॉर्ड आदी सुविधा असणार आहेत. कॅथलॅबमध्ये ऍंजिओग्राफी, एन्जीओप्लास्टी यासह सर्वप्रकारचे उपचार केले जाणार आहेत. यासाठीचे तज्ञ् वैद्यकीय पथक आणि स्टाफही असणार आहे. या सुसज्ज कॅथलॅबमुळे सातारा जिल्ह्यातील हृदयरोग रुग्णांची ससेहोलपट थांबणार असून त्यांना साताऱ्यातच अत्याधुनिक उपचार मिळणार आहेत. कॅथलॅब मंजुरीमुळे आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून आ. शिवेंद्रसिंहराजेंनी जिल्हावासियांच्या वतीने उपमुख्यमंत्री ना. फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
civel
shivendraraje
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Tue 2nd Aug 2022 10:47 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Tue 2nd Aug 2022 10:47 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Tue 2nd Aug 2022 10:47 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Tue 2nd Aug 2022 10:47 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Tue 2nd Aug 2022 10:47 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Tue 2nd Aug 2022 10:47 am
संबंधित बातम्या
-
फलटण शहर व तालुक्यातील निवासी अतिक्रमणे नियमित करणार.मा . खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर
- Tue 2nd Aug 2022 10:47 am
-
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Tue 2nd Aug 2022 10:47 am
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मा.खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट..
- Tue 2nd Aug 2022 10:47 am
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Tue 2nd Aug 2022 10:47 am
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Tue 2nd Aug 2022 10:47 am
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Tue 2nd Aug 2022 10:47 am
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Tue 2nd Aug 2022 10:47 am
-
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Tue 2nd Aug 2022 10:47 am













