शांता जानकर यांना प्रेरणा गौरव पुरस्कार प्रदान

देशमुखनगर : मिडिया चॅरिटेबल फाउंडेशन सातारा ऑल इंडिया रजिस्टर न्यूजपेपर असोसिएशन सांगली या दोन्ही देशपातळीवर संघटनेच्या वतीने सामाजिक शैक्षणिक व्यावसायिक अशा विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांना दी प्राइड ऑफ महाराष्ट्र या पुरस्काराने गौरविण्यात आले या मध्ये सातारच्या शांता लक्ष्मण जानकर यांना हि प्रेरणा गौरव पुरस्कार प्राप्त झाला शांता जानकर या ग्रामपंचायत ऑपरेटर असुन त्या राष्ट्रीय मानवाधिकार दिल्ली संघटनेच्या सातारा जिल्हा अध्यक्ष आहेत तसेच ओबीसी महिला संघटना कार्यअध्यक्ष आहेत ग्रामीण भागात खेडोपाड्यात जाऊन शासकीय योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना समजावून सांगुन त्याचा लाभ मिळवून देतात गरीब व गरजू लोकांना मोफत सहकार्य करतात रोजगार हमी कामाची योजना सांगुन लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे बचत गटांना मार्गदर्शन करणे विविध सामाजिक कार्यामुळे त्यांना पुणे येथे पुरस्कार प्रदान करण्यात आला या कार्यक्रमास श्री आनंद म्हसवेकर(कांबळे) लेखक नाटककार चित्रपट निर्माते व सौ ज्योती कदम.निवासी उपजिल्हाधिकारी पुणे व इतर प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला जानकर यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल सामाजिक शैक्षणिक राजकीय व्यावसायिक व विविध क्षेत्रातुन त्यांच्या कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला