स्व. सर्जेराव कदम- शेडगे (भाऊ) यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

देशमुखनगर :  सातारा जिल्हा सहकारी बोर्डाचे मा.अध्यक्ष धनंजय शेडगे-कदम यांचे वडिल श्री स्व. सर्जेराव रघुनाथ कदम-शेडगे (भाऊ)यांच्या ११  पुण्यस्मरणानिमित्त  सेवासदन लाईफ लाईन यांच्यातर्फे सेवासदन नेत्रालय मिरज यांच्या सौजन्याने सदर शिबिरामध्ये डोळ्यासंदर्भातील सर्व शासकीय मोफत केल्या जातील यामध्ये नेत्रचिकित्सा,मोतीबिंदू निदान, शस्त्रक्रिया शिबीर व सर्व गरजू रुग्णांना मोफत चष्मा वाटप करण्यात येणार आहे. या शिबिराचे आयोजन दि.सोमवार ५ फेब्रुवारी २०२४ सकाळी ९ ते २ आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात पडद्याच्या सर्व नेत्र शस्त्रक्रिया (रेटीना) पडदा निसटणे डायबेटिकमुळे (मधुमेह)पडद्यावर झालेल्या दोषासाठी पडद्याची शस्त्रक्रिया तिरळेपणावर उपचार डायबेटिक रेटिनोपॅथीसाठी ग्रीन लेझर शस्त्रक्रिया, बुबुळांच्या सर्व शस्त्रक्रिया बुबुळ बदलणे पापणीच्या आजारावरील शस्त्रक्रिया, डोळ्याच्या घोबणीच्या शस्त्रक्रिया. डोळ्यातील मास वाढणे या निदान व तपासणी होणार आहे. यातील सर्व शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत तसेच यामध्ये विशेष सुविधा अंतर्गत भारतीय भिंग आणि फिको(लेझर) या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत केल्या जाणार आहेत. आणि शिबिरा अंतर्गत  एन्को लाइफ कॅन्सर सेंटर सातारा यांच्यावतीने कर्करोग तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे .तसेच डाँ.मनिषा मगर यांचे कर्करोग जागरूकता व प्रतिबंध व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे  शिबीरासाठी येताना आधार कार्ड व रेशन कार्ड घेऊन यावी तसेच लहान मुलांचे नेत्ररोग -तिरळेपणा, पापणीची झडप, लहान मुलांचे मोतीबिंदू, डोळ्याच्या दृष्टी दोषांची शस्त्रक्रिया मोफत होणार आहेत यासाठी गरजूंनी मोरया नागरी सह. पतसंस्था अंगापूर तसेच मोरया हॉस्पिटल सातारा  येथे नोंदणी करणे गरजेचे आहे तरी या शिबिराचा लाभ पंचक्रोशीतील गरजूंनी घ्यावा असे आवाहन धनंजय कदम-शेडगे यांनी केले आहे

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला