महाराजांचे मनोमिलन मात्र कार्यकर्त्यांची नाराजी.. प्रचारासाठी भावी नगरसेवकांची दांडी...
Satara News Team
- Tue 5th Nov 2024 06:48 pm
- बातमी शेयर करा
सातारा : साताऱ्याच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही एकेकाळी दोन्ही राजेंचा संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे. मात्र निवडणुकीच्या तोंडावर छत्रपती उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले हे एकत्र काम करताना पाहायला मिळत आहे.. या दोन्ही भावांच्या मधील प्रेम बघून अनेक राजकारणाच्या पुंग्यात टाईट झाल्या तर अनेकांना पराभवाचे धक्के खावे लागले..
लोकसभेला उदयनराजेंच्या प्रचाराची धुरा आणि विजयाचे शिल्पकार म्हणून आमदार शिवेंद्रराजे यांच्याकडे पाहिलं जात आहे.. शिवेंद्रराजे यांच्या आजी-माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी उदयनराजेंचं काम पूर्ण निष्ठेने केले हे सर्व जिल्ह्याने पाहिल आहे..
लोकसभा संपली आणि विधानसभेचे बिगुल वाजलं आहे. छत्रपती उदयनराजे भोसले पूर्ण निष्ठेने आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे काम करताना पाहायला मिळत आहे. मात्र त्यांचे शिलेदार आणि निष्ठावंत कार्यकर्ते काम करताना पाहायला मिळत नाही..
प्रचाराला दांडी मारून छत्रपती उदयनराजे यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे प्रीतम कळसकर आणि शिवानी कळसकर प्रचारापासून विलिप्त असल्याचं पाहायला मिळत आहे.. नक्की आगामी येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने यांची नाराजी असल्याचे स्पष्ट दिसून आले नसले तरी नाराज असल्याच्या चर्चा आता साताऱ्या सुरू झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे.. यावरून दोन्ही राजेंचे कार्यकर्त्यांच्या पुन्हा संघर्ष होणार का अशा चर्चाला उधान आल्याचे पहिल्यांदा मिळत आहे...
स्थानिक बातम्या
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Tue 5th Nov 2024 06:48 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Tue 5th Nov 2024 06:48 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Tue 5th Nov 2024 06:48 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Tue 5th Nov 2024 06:48 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Tue 5th Nov 2024 06:48 pm
संबंधित बातम्या
-
मतदारसंघ पुनर्रचना अजून झालीच नाही; मग शशिकांत शिंदेंची मुंबईत ‘राजकीय मोर्चेबांधणी’ कशासाठी?
- Tue 5th Nov 2024 06:48 pm
-
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Tue 5th Nov 2024 06:48 pm
-
कदमांना “ससा” म्हणत सपकाळांनी टोला मारला; पण आंबेघरचा पराभव आठवताच सोशल मीडियाने सपकाळांनाच घेरले!
- Tue 5th Nov 2024 06:48 pm
-
स्वातंत्र्यदिनी महाबळेश्वरच्या स्वच्छता व पाणीपुरवठ्याला नवी ताकद!
- Tue 5th Nov 2024 06:48 pm
-
आखाडे ठरावाचा राग अनावर; राजे गटाच्या कार्यकर्त्यावर हल्ला, मेढा पोलीस ठाण्यात राजकीय नेत्यांची गर्दी!
- Tue 5th Nov 2024 06:48 pm
-
भाजप बैठकीत वादाचा भडका; गोळे–मानकुमरे आमनेसामने, हातगेघर ठरावावरून आरोप-प्रत्यारोप
- Tue 5th Nov 2024 06:48 pm
-
हुजरेगिरीची कला : काल शशिकांत शिंदे, आज बाबाराजे!
- Tue 5th Nov 2024 06:48 pm












