अॅडव्होकेट संरक्षण कायदा मंजूर करावाःअॅड.सौरभ ढोक

दहिवडी बार असोसिएशनच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

दहिवडी : राहुरी ता.राहुरी जि.अहमदनगर येथील अॅड. रामचंद्र आढाव व अॅड.मनिषा आढाव यांची अपहरण करून हत्या केल्याने दि बार असोसिएशन दहिवडी यांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.याबाबतचे निवेदन माणच्या तहसीलदारांना देण्यात आले आहे.

या निवेदनात असे म्हटले आहे की,दि बार असोसिएशन दहिवडी यांची दिः३०/०१/२०२४ रोजी मिटींग होऊन राहुरी येथील अॅड.रामचंद्र आढाव व अॅड. सौ मनीषा आढाव या दोघांचे अपहरण करून हत्या करण्यात आलेली आहे.सदर हत्येचा अॅडव्होकेट बार असोसिएशन दहिवडी तीव्र निषेध व्यक्त करत आहेत.महाराष्ट्रातील वकील बांधव,भगिनी या सुरक्षित नाहीत.जर न्यायालयातील वकील असुरक्षित राहिल्यास सामान्य माणसांची बाजू निर्भीडपणे न्यायालयात कोण मांडणार हा प्रश्न निर्माण झालेला आहे.याकरिता महाराष्ट्र शासनाने तमाम वकीलांचे सुरक्षिततेकरिता अॅडव्होकेट प्रोटेक्शन अॅक्ट आणून वकीलांना सुरक्षित व निर्भीडपणे काम करता येईल असे सरकारकडून अॅडव्होकेट प्रोटेक्शन अॅक्टहा कायदा करून वकिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण केली पाहिजे.जेणेकरून राहुरीसारखी घटना घडणार नाही,तसेच पक्षकाराच्या मनात वकीलांच्या बाबत आदर राहील व वकिलांच्या वरील हल्ले होणार नाहीत याकरिता शासनाने अॅडव्होकेट प्रोटेक्शन कायदा लागू करावा.

यावेळी अध्यक्ष अॅड.बी.एस.सावंत,अॅड.उपाध्यक्ष एम.एम.पाटील,अॅड.सौरभ ढोक,अॅड.पी.डी.कारंडे,अॅड.अभिजीत राऊत,अॅड.गणेश देवकुळे,अॅड.धीरज क्षीरसागर,अॅड.एम.व्ही.कुलकर्णी यांच्यासह सर्व वकील उपस्थित होते.

वकिलांवर आजपर्यंत वेळोवेळी हल्ले झाले आहेत.यापुढील काळातील हल्ले रोखण्यासाठी शासनाने अॅडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू करावा,आम्ही शासनाला विनंती करतो की शासनाने योग्य ती कार्यवाही करून वकीलांना संरक्षण मिळवून द्यावे,असे अॅड.सौरभ ढोक म्हणाले.

आम्हाला जोडण्यासाठी
esataranews.com

स्थानिक बातम्या

आकृतीबंधाचा शासन निर्णय  दोन वर्षांपूर्वीच  निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

आकृतीबंधाचा शासन निर्णय दोन वर्षांपूर्वीच निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

शिक्षण प्रसारक संस्था  करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शिक्षण प्रसारक संस्था करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या  हस्ते संपन्न...

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या हस्ते संपन्न...

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त