प्रविण गोसावी यांच्यावर कारवाई करा अन्यथा आंदोलन करणार : राम जाधव

शासकीय अनुदानातहजारो रुपयांचा भ्रष्टाचार; शिक्षण विभागाने निष्क्रिय लोकांना पाठीशी घालू नये

पुसेगाव : पुसेगाव येथील भवानीनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे पगारी शिक्षक प्रविण गोसावी यांनी आपल्या जागी कायद्याची पायमल्ली करून अध्यापनासाठी डमी शिक्षक नेमला आहे. तसेच मुख्याध्यापक पदाच्या कालावधीत कोणतेही काम न करता हजारो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. तरी संबंधित शिक्षकावर तात्काळ चौकशी करून निलंबित करावे, अन्यथा ८ दिवसात मुख्य कार्यकारी अधिकारी ऑफिससामोर उपोषण करणार असल्याचा इशारा पुसेगाव राष्ट्रवादी शहराध्यक्ष राम जाधव यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

राम जाधव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, प्रविण गोसावी हे पुसेगाव येथील भवानीनगर शाळेत गेली पावणे पाच वर्षापासून कार्यरत आहेत. दोन वर्षे प्रभारी त्यांनी
मुख्याध्यापक पदाचा कार्यभार  सांभाळला. या कालावधीत शासनाकडून शाळेच्या खर्चासाठी ५० हजार अनुदान आले होते. श्री गोसावी यांनी मेडिकल, स्टेशनरी आणि फर्निचर इत्यादींची बिले सादर करून दुकानदारांच्या नावावर चेक काढले. मात्र काही दुकानदारांकडून वस्तू खरेदी करण्याऐवजी रोख रक्कम स्वतःकडे घेऊन हजारो रुपयांचा भ्रष्टाचार केला. या विषयांतील पालकांच्या आक्रमक भूमिकेमुळे त्यांना मुख्याध्यापक पदाचा राजीनामा द्यावा लागला. 

प्रविण गोसावी हे सध्या चौथीच्या वर्गाचे वर्गशिक्षक आहेत. त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहिली तर शिक्षण विभागाला लाज वाटेल. ते आपले ज्ञानदानाचे कार्य सोडून तास न तास मोबाईलमध्ये खेळत असतात. त्यांच्या या निष्क्रियतेमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय झालेले आहे. श्री गोसावी हे शाळेच्या आवारात व वर्गात गुटखा, तंबाखूचे सेवन करताना विद्यार्थी, पालकांना आढळून येतात. म्हणून पालक, ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीने आक्रमक भूमिका घेतली. व्यसनाधीनता अडकल्यामुळे त्यांनी स्वताच्यात सुधारणा न करता आपल्या जागी चौथीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी ५ हजार पगारावर "डमी शिक्षकाची" नेमणूक केली आहे. त्यांनी केलेली डमी शिक्षकाची नेमणूक ही कायद्याच्या चौकटीत कुठेही बसत नाही.असे असताना ही  डमी शिक्षकाला श्री गोसावी हे स्वतःच्या खिशातील पगार देतात. अशा चुकीच्या प्रकाराला शिक्षण विभागाने पांघरून घातले तर जिल्ह्यात डमी शिक्षकांचे पेव माजेल आणि जिल्हा परिषदेच्या शाळांना पुन्हा वाईट दिवस येतील. डमी शिक्षक प्रकरणाचे वस्तुनिष्ठता तपासून शहानिशा करावी. 

या व्यतिरिक्त पत्ते खेळणे, दारू पिणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे अशा वागणूकीमुळे शाळेची मोठ्या प्रमाणावर बदनामी होत आहे. गोसावी यांच्याकडून शिक्षकी पेशाला काळीमा फासला जाईल अशी वागणूक कायमच केली जात आहे. त्यामुळे प्रविण गोसावी यांची चौकशी करून त्यांचे तात्काळ निलंबित होणे गरजेचे आहे. 

प्रविण गोसावी दोषी असल्यास कारवाई करणार : शबनम मुजावर

आम्हाला जोडण्यासाठी
esataranews.com

स्थानिक बातम्या

आकृतीबंधाचा शासन निर्णय  दोन वर्षांपूर्वीच  निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

आकृतीबंधाचा शासन निर्णय दोन वर्षांपूर्वीच निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

शिक्षण प्रसारक संस्था  करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शिक्षण प्रसारक संस्था करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या  हस्ते संपन्न...

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या हस्ते संपन्न...

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त