महाविद्यालयीन तरुणीचा मोबाईल हॅक करून Phone pay वरून तब्बल 3 लाख 70 हजार रुपये लंपास
Satara News Team
- Tue 18th Apr 2023 10:19 am
- बातमी शेयर करा
पाटण ; इंटरनेटवरून पैशांची फसवणूक होण्याचे प्रकार अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. शहरी भागात सायबर क्राईमचे गुन्हे हे नित्याचेच असताना आता ग्रामीण भागही याचा शिकार होत आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एका महाविद्यालयीन तरुणीचा मोबाईल हॅक करून Phone pay वरून तब्बल 3 लाख 70 हजार रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे.
मल्हारपेठ भागातील (ता. पाटण) येथील महाविद्यालयीन युवतीचा मोबाईल ‘हॅक’ करुन तीच्या गुगल पे व फोन पे वरुन बँक खात्यातील तब्बल 3 लाख 70 हजार रुपये अज्ञाताने काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत संबंधित युवतीच्या फिर्यादीवरून मल्हारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मल्हारपेठ विभागातील एका गावात राहणारी युवती महाविद्यालयीन शिक्षण घेते. तीचे स्टेट बँकेच्या पाटण शाखेत बचत खाते आहे. तसेच पोस्ट पेमेंट बँक खातेही आहे. संबंधित दोन्ही खात्यावर तीने रक्कम ठेवली होती. तसेच मोबाईलमध्ये तीने दोन सिमकार्ड क्रमांकांवर गुगल आणि फोन पे सुरू करुन त्याद्वारे ती गरजेनुसार आॅनलाईन व्यवहार पे करायची.
दरम्यान, 27 मार्च ते 14 एप्रिल या कालावधीत त्या युवतीच्या मोबाईलचा अज्ञात व्यक्तीने ‘अॅक्सेस’ घेतला. दुसऱ्या डिव्हाईसवरून आरोपीने युवतीच्या मोबाईलचा ताबा घेत स्टेट बँक खात्यातील 2 लाख 80 हजार रुपये तसेच पोस्ट पेमेंट बँक खात्यातील 90 हजार रुपये असे एकुण 3 लाख 70 हजार रुपये काढून घेतले. मोबाईलचा अॅक्सेस घेऊन ‘फोन पे’ व ‘गुगल पे’द्वारे करण्यात आलेला विभागातील हा पहिलाच गुन्हा असल्यामुळे पोलीसही चक्रावले आहेत. या गुन्ह्याची नोंद मल्हारपेठ पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलीस निरीक्षक विकास पाडळे तपास करीत आहेत.
स्थानिक बातम्या
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Tue 18th Apr 2023 10:19 am
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Tue 18th Apr 2023 10:19 am
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Tue 18th Apr 2023 10:19 am
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Tue 18th Apr 2023 10:19 am
म्हसवड नगरपरिषदेत सूर्यवंशी दाम्पत्य ठरले ’धुरंदर’!
- Tue 18th Apr 2023 10:19 am
सातारा नगरपरिषद निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान
- Tue 18th Apr 2023 10:19 am
संबंधित बातम्या
-
CPF FRIENDS COMMANDO FORCE FOUNDATION महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी तात्याबा वाघमोडे यांची नियुक्ती
- Tue 18th Apr 2023 10:19 am
-
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Tue 18th Apr 2023 10:19 am
-
डॉ. सूर्यकांत दोशी यांची फलटण नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक साठी व्यापारी व जैन बांधवांकडून आग्रही मागणी
- Tue 18th Apr 2023 10:19 am
-
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Tue 18th Apr 2023 10:19 am
-
सेवागिरी यात्रेत प्रशासनाने योग्यरित्या नियोजन करावे — आमदार महेश शिंदे
- Tue 18th Apr 2023 10:19 am
-
पंतप्रधान पदासाठी लवकरच मराठी माणूस दिसेल.
- Tue 18th Apr 2023 10:19 am
-
शिक्षण प्रसारक संस्थेतील विद्यार्थी अध्ययनासाठी करणार टॅबचा वापर
- Tue 18th Apr 2023 10:19 am











