मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाबळेश्वर भागातील शिवसैनिक आणि नागरिकांचा पाठिंबा..

Chief Minister Eknath Shinde is supported by Shiv Sainiks and citizens of Mahabaleshwar area..

महाबळेश्वर : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील कोयना,सोळशी, कांदाटी या भागातील  शिवसैनिक आणि नागरिकांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिलाय.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे आणि त्यांचे बंधू ठाण्याचे नगरसेवक प्रकाश शिंदे यांच्या उपस्थितीत  एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्र्यांचे आजोळ असलेल्या अहिर या गावी पाठिंबा देण्यासाठी शेकडो जणांची उपस्थिती होती.. वडील आणि बंधू यांचा गावकऱ्यांनी सत्कार करत शिंदे गटात प्रवेश केलाय.. महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम कोयना विभागाचे सुपुत्र पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्याने या भागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.. एकनाथ शिंदेंना आणि शिंदे गटाला सर्व कोयना विभागातील नागरिकांचा पाठिंबा असून सामान्य कुटूंबातील मुलगा मुख्यमंत्री झाल्याने कोयना विभागातील नागरिकांच्यात उत्साहाचे वातावरण पसरले आहे.कोयना विभागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकासकामांना चालना द्यावी. रोजगार, आरोग्य,पर्यटन त्याचबरोबर अनेक विकासकामे व्हावेत.अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केलीये...

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला