स्व. सर्जेराव रघुनाथ कदम यांच्या दहाव्या पुण्यस्मरणानिमित्त अंगापूर येथे सर्व रोग निदान शिबिर

देशमुखनगर :  ‌अंगापूर ता. सातारा येथे स्व. सर्जेराव रघुनाथ कदम यांच्या दहाव्या पुण्यस्मरणानिमित्त रविवार दि. पाच रोजी मोरया हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या सौजन्याने मोफत सर्व रोग निदान व औषधोपचार शिबिर आयोजित करण्यात आले आहे.                         नागरिकांना विविध आजाराच्या उपचारासाठी  शहराच्या ठिकाणी जावे लागू नये त्यांना स्थानिक पातळीवरच उपचाराची सोय व्हावी याकरिता मोरया हॉस्पिटलमार्फत आरोग्य शिबिराचे नियोजन करण्यात आले आहे.या शिबिरात सर्व प्रकारच्या रुग्णांची तपासणी तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत मोफत होणार आहे, यामध्ये मशीनद्वारे हाडांची ढिसूळता तपासणी, ब्लडप्रेशर, ब्लडशुगर, पी एफ टी टेस्ट ( मशिनद्वारे फुफुसांची कार्यक्षमता तपासणी) डोळ्यांची तपासणी तसेच गरजू लोकांना मोफत औषध देण्यात येणार आहेत. रुग्णांनी शिबिरापूर्वी नाव नोंदणी करणे गरजेचे आहे, या शिबिराचा परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन धनंजय शेडगे यांनी केले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला