तो भाजपच्या प्रवक्ता, त्रिवेदीची हलकपट्टी करा व राज्यपालाला खाली ओढून लांब फेकून दया: नाहीतर माझ मी बघतो श्री छ. उदयनराजे भडकले
राज्यपाल व त्रिवेदीची हकलपट्टी करा नाहीतर मी काय करायच ते करतो खा.श्री.छ.उदयनराजेंचा भाजपला इशारा*Satara News Team
- Mon 21st Nov 2022 04:55 am
- बातमी शेयर करा
सातारा: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या एका वक्तव्यामुळे सध्या महाराष्ट्रातील राजकारण कमालीचे तापले आहे. कोश्यारी यांच्या या वक्तव्याबद्दल राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. मात्र, या परिस्थितीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले सर्व वकिली कौशल्य पणाला लावून भगतसिंह कोश्यारी यांचा भक्कमपणे बचाव केला आहे. राज्यपाल कोश्यारींच्या मनात शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाविषयी कोणतीही शंका नाही. त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. भगतसिंह कोश्यारी यांच्या मनात शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. मात्र, भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी फडणवीसांच्या भूमिकेशी फारकत घेत राज्यपाल कोश्यारींवर हल्ला चढवला आहे.
भगतसिंह कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांनी शिवाजी महाराजांविषयी वक्तव्य करण्यापूर्वी शिवरायांचा इतिहास वाचायला हवा होता. कोश्यारींनी अशाप्रकारचे वक्तव्य करण्याची ही काही पहिली वेळ नाही. त्यांनी यापूर्वी अनेकदा शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्यं केली आहेत. यासंदर्भात भगतसिंह कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र देणार आहे, असे उदयनराजे भोसले यांनी सांगितले.
शिवाजी महाराजांविषयी अशी वक्तव्यं करणाऱ्या या लोकांची एकतर बुद्धी भ्रष्ट झाली आहे किंवा त्यांच्या अंगात विकृती असावी. यामुळे त्यांचा कदाचित अंतही होऊ शकतो. त्यांच्या वक्तव्यांचे कोणीही समर्थन करणार नाही. राज्यपाल हे मोठं पद आहे. भगतसिंह कोश्यारी यांना झेपत नसेल तर या पदावरून बाजूला व्हावे, अशी खरमरीत टीका उदयनराजे भोसले यांनी केली. त्यामुळे आता हा वाद आणखी किती चिघळणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
संभाजीराजे छत्रपती यांनीही या मुद्द्यावरुन राज्यपाल कोश्यारी यांना फटकारले. राज्यपाल असं का बडबडतात, मला समजत नाही. याआधीही त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरुन हटवावं अशी मागणी मी पंतप्रधान मोदींकडे केली होती. आताही मी तीच मागणी करतोय. खरंच अशी व्यक्तीच आम्हाला महाराष्ट्रात नको. या महाराष्ट्राचे वैभव छत्रपती शिवाजी महाराज असंख्य जणांचे प्रेरणास्त्रोत आहेत. महाराष्ट्र भूमी संतांची भूमी आहे. घाणेरडे शब्द आणि इतके घाणेरडे विचार राज्यपालांच्या मनामध्ये येऊच कसे शकतात? यांना राज्यपाल म्हणून ठेवलंत तरी कसं? अशी संतप्त प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली.
#DevendraFadnavis
#BhagatsinghKoshyari
स्थानिक बातम्या
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Mon 21st Nov 2022 04:55 am
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Mon 21st Nov 2022 04:55 am
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Mon 21st Nov 2022 04:55 am
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Mon 21st Nov 2022 04:55 am
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Mon 21st Nov 2022 04:55 am
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Mon 21st Nov 2022 04:55 am
संबंधित बातम्या
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Mon 21st Nov 2022 04:55 am
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Mon 21st Nov 2022 04:55 am
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Mon 21st Nov 2022 04:55 am
-
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Mon 21st Nov 2022 04:55 am
-
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Mon 21st Nov 2022 04:55 am
-
वाठार निंबाळकर येथील शेतकरी आक्रमक. जिल्हा परिषद निवडणुकीत मतदानावर बहिष्कार.
- Mon 21st Nov 2022 04:55 am
-
पुसेसावळी गटात निवडून कोणाला आणायचं यापेक्षा पाडायचं कोणाला यावर भर.
- Mon 21st Nov 2022 04:55 am
-
राज्यात सरकार युतीचे अन् पुसेसावळी जिल्हा परिषद गटात विकास निधीचे श्रेय मात्र भाजपचे?
- Mon 21st Nov 2022 04:55 am











