यात्रेनिमित्त शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धाना उत्साहात प्रारंभ

 पुसेगाव;  श्री सेवागिरी यात्रेनिमित्त अखिल भारतीय दिवसरात्र शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धाना उत्साहात प्रारंभ झाला.
  दि ६ व ७ या दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन मठाधिपती प पु सुंदरगिरी महाराज देवस्थान ट्रस्टचे चेअरमन रणधीर जाधव,विश्वस्त डॉ सुरेश जाधव ,बाळासाहेब जाधव,संतोष वाघ,सचिन देशमुख, गौरव जाधव ,पत्रकार ,व्हॅलीबॉल कमिटी चे सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. 
             येथील हनुमानगिरी हायस्कुल च्या मैदानावर या स्पर्धा होत आहेत.विजेत्या संघांना साखळी पद्धतीने दिवसरात्र होणारे हे सामने शुटिंग बॉल फेडरेशन ऑफ इंडिया व अँमॅच्युअर शुटिंग बॉल असोसिएशन यांच्या मान्यतेनुसार होणार आहेत.राज्यासह देशाच्या विविध भागातून या स्पर्धेसाठी संघ आले असून, या सामन्यासाठी महासचिव तोमर सर, अध्यक्ष संग्राम दादा देशमुख, उपाध्यक्ष जयवंत दादा, मनोहर साळवी, विष्णू निकम, राजू मोहिते, अतुल निकम,  विजय कोकीळ,खन्ना सर, रफिक सर,अरुण कुमार वैद्य,अरविंद पाटील, आरमान पंजाब, प्रवीण कुमार युपी, जसा गंगापूर, इत्यादी नामवंत खेळाडू व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. नेत्रदीपक सामने पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.
           विजेत्या संघांना अनुक्रमे ५१हजार,३१हजार,२१हजार,११हजार रुपये तर क्रमांक पाचवा ते आठवा क्रमांकाना प्रत्येकी ३ हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहेत.

पत्रकार दिनाचे औचित्य साधून या स्पर्धेच्या उदघाटनानंतर  श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट चे मठाधिपती, चेअरमन सर्व विश्वस्त यांच्या विरुद्ध पुसेगाव पत्रकार संघाचा प्रेक्षणीय सामना झाला.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला