उरमोडी धरणात पोहताना बुडालेल्या 2 युवकांचे मृतदेह शोधण्यात शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमला यश

सातारा  : उरमोडी धरणात रविवारी सायंकाळी साताऱ्यातील सदर बाजार येथील बुडालेल्या दोन्ही युवकांचे मृतदेह शोधण्यात शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमला यश आले आहे.आकाश साठे आणि सौरव चौधरी अशी दोघा मित्रांची नावे आहेत.आज सोमवारी सकाळपासूनच या दोघांचा उरमोडी पात्रात शोध घेण्याचे सुरू केल्यानंतर दुपारी आकाश रामचंद्र साठे याचा मृतदेह मिळून आला तर सौरभ सुनील चौधरी याचा संध्याकाळच्या सुमारास मृतदेह सापडला.उरमोडी धरण परिसरामध्ये दोघेही फिरण्यासाठी गेले होते रविवारी सायंकाळी दोघेही  धरणात पोहण्यासाठी उतरले त्यावेळी पोहताना दम लागल्याने ते बुडाले असल्याची माहिती समोर आली. दोन्ही युवक सदर बाजार येथील रहिवासी असल्यामुळे दोघांच्या नातेवाईकांसह परिसरातील मित्र परिवाराने मोठी गर्दी उरमोडी परिसरात केली होती. या शोध मोहिमेत शिवेंद्रराजे रेस्क्यू टीम यांच्यासह सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके हे सहभागी होऊन दोन्ही युवकांचे मृतदेह 24 तासाच्या आत शोधून काढले या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला