औंध पोलिसांची धडक कारवाई; गुन्हेगारी प्रवृत्तीला सणसणीत चाप.
खटाव तालुक्यातील घटना; अपहरण व अत्याचारप्रकरणी आरोपी जेरबंद.आशपाक बागवान.
- Thu 26th Nov 2026 12:18 pm
- बातमी शेयर करा
पुसेसावळी : गुन्हेगारांच्या मनसुब्यांना सुरूंग लावत औंध पोलिसांनी पीडित मुलीचा शोध घेऊन आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या जलद तपासामुळे आणि वाढवलेल्या गंभीर कलमांमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला सणसणीत चाप बसल्याचे बोलले जात आहे.
पोलिस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, औंध पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १५८/२०२६ अन्वये बी.एन.एस.एस. कलम १३७(२) प्रमाणे पीडित मुलीचे अपहरण झाल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यादिशेने तपास करत पीडित मुलीचा शोध घेतल्यावर पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ओमकार विभीषण धुमाळ,वय २१, मूळ रा. वाकेश्वर, ता. खटाव; सध्या रा. कळंबी, ता. खटाव. याने दि. ०२/११/२०२६ रोजी 'मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे' असे सांगून तिला पळवून नेले आणि तिच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबंध केले.
पिडितेने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी गुन्ह्यात अधिक गंभीर कलमांची वाढ केली आहे.त्यामध्ये भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस.) कलम ६४, ६४(२)(एम), ६५(१), बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) कलम ४, ६, ८, १२ तसेच अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमातील कलम ३(१)(डब्ल्यू)(आय)(आयआय), ३(२)(व्हीए), ३(२)(व्ही) यांचा समावेश आहे.
आरोपी ओमकार विभीषण धुमाळ याला औंध पोलिसांनी सापळा रचून अटक करण्यात आली असून पुढील तपास रणजीत सावंत, उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग, कॅम्प वडूज हे करत आहेत.
@pusesavali
स्थानिक बातम्या
औंध पोलिसांची धडक कारवाई; गुन्हेगारी प्रवृत्तीला सणसणीत चाप.
- Thu 26th Nov 2026 12:18 pm
सूर्यकिरण एरोबॅटिक टीमच्या हवाई कसरतींसाठी साताऱ्यात वाहतूकीतील उद्याचा बदल कसा असणार
- Thu 26th Nov 2026 12:18 pm
दरोडा तयारीच्या गुन्ह्यातील सात वर्षांपासून फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
- Thu 26th Nov 2026 12:18 pm
२६/११ च्या शहीदांना अभिवादन; सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे उद्या महा रक्तदान शिबिराचे आयोजन
- Thu 26th Nov 2026 12:18 pm
पुसेसावळीतील अवैध धंद्यांवर पोलिस कारवाईची धार हवी; केवळ धाडी पुरेशा की मुळावर घाव गरजेचा?
- Thu 26th Nov 2026 12:18 pm
संबंधित बातम्या
-
दरोडा तयारीच्या गुन्ह्यातील सात वर्षांपासून फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
- Thu 26th Nov 2026 12:18 pm
-
पुसेसावळीतील अवैध धंद्यांवर पोलिस कारवाईची धार हवी; केवळ धाडी पुरेशा की मुळावर घाव गरजेचा?
- Thu 26th Nov 2026 12:18 pm
-
ढेबेवाडीत मगर बंधू ज्वेलर्समध्ये चोरी; नऊ तोळे सोने लंपास!
- Thu 26th Nov 2026 12:18 pm
-
महामार्गावर कवठे गावानजीक एक किलो सोने दरोडेखोरांनी लुटले
- Thu 26th Nov 2026 12:18 pm
-
खरेदी दस्ताची नोंद मंजूर करण्यासाठी तीन हजारांची लाच; मंडलाधिकारी रंगेहाथ जाळ्यात
- Thu 26th Nov 2026 12:18 pm
-
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीत ‘सगळेच वैध’ कसे?
- Thu 26th Nov 2026 12:18 pm
-
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Thu 26th Nov 2026 12:18 pm
-
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Thu 26th Nov 2026 12:18 pm










