दरोडा तयारीच्या गुन्ह्यातील सात वर्षांपासून फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
Satara News Team
- Wed 25th Nov 2026 06:45 pm
- बातमी शेयर करा
सातारा : दरोडा तयारीच्या गुन्ह्यात गेल्या सात वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. विलास सुखदेव वाईकर (रा. मतकर कॉलनी झोपडपट्टी, सातारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
सातारा जिल्ह्यात पाहिजे व फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यासाठी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांनी नोव्हेंबर महिन्यात विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी स्थानिक गुन्हे शाखेची विविध पथके तयार करून फरार आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले होते.
दरम्यान, 23 नोव्हेंबर रोजी पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना गोपनीय बातमीदारामार्फत शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील सात वर्षांपासून फरार आरोपी विलास वाईकर हा मोळाचा ओढा परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परिसरात शोध घेतला असता, संबंधित संशयित मोळाचा ओढा येथील आयटीआय कॉलेज परिसरात आढळून आला.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव विलास सुखदेव वाईकर असल्याचे सांगितले. शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल दरोडा तयारीच्या गुन्ह्याबाबत विचारणा केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत यादव, रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर, पोलीस हवालदार संतोष सपकाळ, शरद बेबले, लैलेश फडतरे, अमित माने, अमित सपकाळ, स्वप्निल कुंभार, ओंकार यादव व किरण जगताप यांनी केली.
स्थानिक बातम्या
सूर्यकिरण एरोबॅटिक टीमच्या हवाई कसरतींसाठी साताऱ्यात वाहतूकीतील उद्याचा बदल कसा असणार
- Wed 25th Nov 2026 06:45 pm
दरोडा तयारीच्या गुन्ह्यातील सात वर्षांपासून फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
- Wed 25th Nov 2026 06:45 pm
२६/११ च्या शहीदांना अभिवादन; सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे उद्या महा रक्तदान शिबिराचे आयोजन
- Wed 25th Nov 2026 06:45 pm
पुसेसावळीतील अवैध धंद्यांवर पोलिस कारवाईची धार हवी; केवळ धाडी पुरेशा की मुळावर घाव गरजेचा?
- Wed 25th Nov 2026 06:45 pm
संबंधित बातम्या
-
पुसेसावळीतील अवैध धंद्यांवर पोलिस कारवाईची धार हवी; केवळ धाडी पुरेशा की मुळावर घाव गरजेचा?
- Wed 25th Nov 2026 06:45 pm
-
ढेबेवाडीत मगर बंधू ज्वेलर्समध्ये चोरी; नऊ तोळे सोने लंपास!
- Wed 25th Nov 2026 06:45 pm
-
महामार्गावर कवठे गावानजीक एक किलो सोने दरोडेखोरांनी लुटले
- Wed 25th Nov 2026 06:45 pm
-
खरेदी दस्ताची नोंद मंजूर करण्यासाठी तीन हजारांची लाच; मंडलाधिकारी रंगेहाथ जाळ्यात
- Wed 25th Nov 2026 06:45 pm
-
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीत ‘सगळेच वैध’ कसे?
- Wed 25th Nov 2026 06:45 pm
-
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Wed 25th Nov 2026 06:45 pm
-
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Wed 25th Nov 2026 06:45 pm
-
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Wed 25th Nov 2026 06:45 pm











