सूर्यकिरण एरोबॅटिक टीमच्या हवाई कसरतींसाठी साताऱ्यात वाहतूकीतील उद्याचा बदल कसा असणार
Satara News Team
- Wed 25th Nov 2026 06:54 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा सैनिक स्कूलच्या वतीने आणि भारतीय वायुसेनेच्या सहकार्याने गुरुवार, २६ नोव्हेंबर रोजी भारतीय वायुसेनेची प्रसिद्ध सूर्यकिरण एरोबॅटिक टीम साताऱ्याच्या आकाशात थरारक हवाई कसरती सादर करणार आहे. या कार्यक्रमासाठी सातारा शहरासह जिल्ह्यातील विद्यार्थी, नागरिक तसेच व्हीव्हीआयपी आणि व्हीआयपी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सातारा शहरातील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ३४ अन्वये गुरुवार, २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत काही मार्गांवर वाहतुकीस बंदी घालण्याची अधिसूचना जारी केली आहे.
या मार्गांवर वाहतुकीस बंदी
पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक तसेच बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते पोवई नाका या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी राहणार आहे. तसेच गोडोली नाका, साईबाबा मंदिर मार्गे जिल्हा परिषद चौकात येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. कनिष्क मंगल कार्यालयाच्या बाजूकडून जिल्हा परिषद चौकात येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांनाही प्रवेश बंद राहणार आहे.
वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग
बॉम्बे रेस्टॉरंट बाजूकडून शहरात येणारी वाहने : अजंठा चौक, गोडोली नाका मार्गे पोवई नाक्याकडे येतील व याच मार्गाने बाहेर जातील.
वाढे फाटा बाजूकडून शहरात येणारी वाहने : जुना आरटीओ चौक, पारंगे चौक, पोवई नाका मार्गे शहरात प्रवेश करतील व याच मार्गाने बाहेर जातील.
खेड चौक बाजूकडून शहरात येणारी वाहने : सिव्हिल हॉस्पिटल, पोवई नाका मार्गे शहरात प्रवेश करतील व याच मार्गाने बाहेर जातील.
मोळाचा ओढा बाजूकडून शहरात येणारी वाहने : भुविकास चौक, एसटी स्टँड, पोवई नाका मार्गे शहरात प्रवेश करतील व याच मार्गाने बाहेर जातील.
या वाहतूक बदलातून रुग्णवाहिका, पोलीस वाहने, अग्निशमन दलाची वाहने आणि इतर सरकारी वाहनांना वगळण्यात आले आहे.
सूर्यकिरण एरोबॅटिक टीमच्या हवाई कसरती पाहण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्थानिक बातम्या
सूर्यकिरण एरोबॅटिक टीमच्या हवाई कसरतींसाठी साताऱ्यात वाहतूकीतील उद्याचा बदल कसा असणार
- Wed 25th Nov 2026 06:54 pm
दरोडा तयारीच्या गुन्ह्यातील सात वर्षांपासून फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
- Wed 25th Nov 2026 06:54 pm
२६/११ च्या शहीदांना अभिवादन; सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे उद्या महा रक्तदान शिबिराचे आयोजन
- Wed 25th Nov 2026 06:54 pm
पुसेसावळीतील अवैध धंद्यांवर पोलिस कारवाईची धार हवी; केवळ धाडी पुरेशा की मुळावर घाव गरजेचा?
- Wed 25th Nov 2026 06:54 pm
संबंधित बातम्या
-
२६/११ च्या शहीदांना अभिवादन; सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे उद्या महा रक्तदान शिबिराचे आयोजन
- Wed 25th Nov 2026 06:54 pm
-
शाहूनगर चौकातील रस्ता खचला; उघड्या गटारामुळे अपघातांचा धोका
- Wed 25th Nov 2026 06:54 pm
-
मसूर पोलिस ठाण्यातील ई-चलान मशीन गैरवापराने शासकीय वाहने आणि शस्त्रांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर!
- Wed 25th Nov 2026 06:54 pm
-
पुसेसावळी येथे अन्न व औषध प्रशासनाच्या अभिनव उपक्रमातून रईस चा जन्म
- Wed 25th Nov 2026 06:54 pm
-
मसूर पोलिस ठाण्याच्या कारभाऱ्यांनी वरिष्ठांच्या आदेशाला दाखवली केराची टोपली?
- Wed 25th Nov 2026 06:54 pm
-
सातारा पोलिसांची मोठी कामगिरी; ४४९ नागरिकांना चोरीचे, हरवलेले मोबाईल परत
- Wed 25th Nov 2026 06:54 pm
-
औंध पोलिस ठाण्याचे कारभारी जानकर आणि एस.डि.पी.ओ. सावंत यांचे खुद्द पोलिस अधीक्षकांना चॅलेंज?
- Wed 25th Nov 2026 06:54 pm










