मिनी काश्मीर तापोळा-बामनोलीचे तापमान 5 अंशावर

सातारा : महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा व जावळी तालुक्यातील बामनोली परिसरात कमालीची थंडीची लाट पसरली आहे. उत्तर भारतातील बल्पवृष्टीचा परिणाम महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तापोळा बामनोली परिसरातील तापमान पाच अंशावर पोहोचले आहे हुडहुडी भरणारी थंडी व कमालीचा गारठा तापोळा बामनोली परिसरातील पर्यटकांसह स्थानिक नागरिकांना अनुभवास मिळत आहे गतवर्षीच्या पन्नास वर्षाच्या तापमानाचा रेकॉर्ड तापोळा बामनोली परिसराने ओलांडला आहे तापोळा बामनोली परिसरात इतक्या प्रमाणात थंडीचे प्रमाण कधीच आढळले नव्हते असे स्थानिक नागरिक सांगतात मात्र समुद्रसपाटी पासून 4000 मीटर उंच असणाऱ्या महाबळेश्वर पाचगणीचे समसमान तापमान तापळा बामनोली परिसरात आढळून आले शिवसागर जलाशयातून पाहते पाण्यातून निघणाऱ्या वाफा हवामानातील प्रचंड गारठा व निसर्गाचा अद्भुत आनंद घेण्यासाठी आलेले पर्यटक यांना हा गारठा व गुलाबी थंडीचा अनुभव चांगलाच आला आहे आजपर्यंतच्या इतिहासात तापोळा  परिसरात अशा पद्धतीची थंडी कधीच स्थानिकांसह पर्यटकांनी अनुभवली नव्हती मात्र उत्तर भारतातील पडणाऱ्या बर्फदृष्टी चा परिणाम महाबळेश्वर पाचगणीसह मिनी काश्मीर तापोळा बामनोलीला ही अनुभवास मिळाला

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त