साताऱ्याचं वाटोळं थांबवा: दीपक पवार
Satara News Team
- Fri 2nd Sep 2022 05:09 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सध्या सातारा शहरांमध्ये यवतेश्वर ते कास या रस्त्यावरील बेकायदेशीर बांधकामाबद्दल आमदार आणि खासदार यांच्यामध्ये वाक युद्ध सुरू आहे. परंतु या सर्वांना माझे सांगणे की सगळ्यात पहिल्यांदा आपण सातारा शहराचं वाटोळं थांबवावं. चार भिंती, अजिंक्यतारा, बोगदा, महालदरे ,व पेढ्याच्या भैरोबा, कास येवतेश्वर ही आमची सातारा शहराची (फुफुस) आहेत .
अशा परिस्थितीमध्ये या सर्व परिसराला अतिक्रमण आणि बेकायदेशीर बांधकाम यांनी विळखा घातलेला आहे आणि तुम्ही मंडळी येवतेश्वर कास रस्त्याबद्दल बोलत आहात. आधी आपल्या शहराचा विचार करा आणि तिथली बांधकाम पाडा अत्यंत सोयीने सर्वजण बोलत असतात आमदार साहेब म्हणतात की बेकायदेशीर बांधकाम कायदेशीर करा आणि खासदार साहेब म्हणतात की बाहेरच्या लोकांचे बांधकाम पाडा आणि स्थानिक लोकांचे बांधकाम ठेवा उद्या सातारा शहरांमध्ये ह्या परिसरात असलेलं बांधकाम कोणत्या धर्तीवर ती पाडायचं बाहेरच्या आहेत का स्थानिका म्हणून .चार भिंती गिळंकृत झालेली आहे ,अजिंक्यताराच्या दरवाजापर्यंत ,आता अतिक्रमणाची घरे येऊ लागतील, बोगदा परिसर, संपूर्ण अतिक्रमीत झालेले आहे पेढ्याच्या बहिरोबाच्या तिथे देखील अतिक्रमणाला सुरुवात झालेले आहे महालदरे येथे फॉरेस्ट क्षेत्र असल्यामुळे ते थोडसं राहिलेला आहे.
केवळ आणि केवळ येवतेश्वर कास रस्ता हाच खऱ्या अर्थाने निसर्ग संपन्न आणि मोकळा श्वास घेण्यासारखा राहिलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये सातारा शहरातील तरुणाई, त्याचबरोबर कुटुंबीय, त्यांचे पै पाहुणे, मित्रपरिवार, या ठिकाणी भेटीस येतात त्यावेळी अत्यंत निसर्गाने नटलेल्या ह्या परिसराला खूप लोक दाद देतायेत. परंतु अलीकडे जशी या ठिकाणी गर्दी वाढू लागली तसा या ठिकाणी बाजार सुरू झालेला आहे ज्याला मिळेल त्या ठिकाणी बांधकाम सुरू आहे अवैध धंदे, त्याचबरोबर रस्त्याच्या कट्ट्यावर राजरोसपणे बसून दारूच्या बाटल्या फोडणे, त्यामुळे हा संपूर्ण परिसर पूर्णपणे उध्वस्त होत चाललेला आहे अशा परिस्थितीमध्ये निसर्ग आणि पर्यावरण वाचवायचा असेल तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा बेकायदेशीर बांधकाम तोडणे हे अत्यंत गरजेचे आहे.
कुणीही कायद्यापेक्षा मोठा नाही. मध्यंतरी विधानसभेमध्ये आपल्या आमदारांनी गर्जना केली की विधान भवन परिसरामध्ये छत्रपती शिवरायांचे स्मारक व्हावे चांगली बाब आहे. माझी आमदार साहेबांना एकच सांगणं आहे की गेली पन्नास वर्षे सातारा शहरांमध्ये आपल्या दोनच कुटुंबाची सत्ता आहे. आपण आपल्या साखर कारखाना अथवा 35 वर्ष सातारा शहराची नगरपालिका आपल्या हातामध्ये होती त्यावेळी शिवस्मारक का उभारले नाही. आणि त्याच विधानसभेने कायदे मंडळाने कायदे बनवलेले आहेत की जे बेकायदेशीर बांधकाम असेल ते तोडलं पाहिजे. आणि आपण सांगता बेकायदेशीर बांधकाम कायदेशीर करा हे कुठल्या तत्वात बसतं. आपले काही कंत्राटी किंवा बगलबच्चे असतील यांची बांधकामं तोडण्यासाठी जर का तुम्ही कायदा मोडत असाल तर ही गोष्ट चुकीची आहे. आपण तीन ते चार लाख मतदारांच्या मतदारसंघात आहेत आणि हे या मतदारसंघातील सर्व लोक (मुकी) किंवा (आंधळी) नाहीयेत त्यामुळे आपल्यावरती याचा परिणाम होत नाही. असा काही समज आपण करू नये सातारा आणि जावळी विधानसभा मतदारसंघातील पर्यावरणाचे आणि निसर्गाचा ऱ्हास करण्याचा सपाटा आमदार साहेबांनी लावलेला आहे. आमच्या सुंदर, सजलाम, सुफलाम, जावळी तालुक्यामध्ये गणपतीचा माळ, माहिगाव, वाघेश्वर, आंबेघर असेल या ठिकाणी सुरू केलेल्या दगडाच्या खाणी व स्टोन क्रशर हे कुणाच्या आशीर्वादाने चाललेले याचे उत्तर आमदार साहेबांनी द्यावं. त्याचप्रमाणे कास ते महाबळेश्वर राजमार्गावरती जे मोठ मोठे टॉवर म्हणजेच (पवन चक्क्या) उभे आहेत त्या कोणाच्या आहेत. त्यांचे नाव सांगावेत व त्याला कायदेशीर परवानगी आहेत का असं लोकप्रतिनिधी या नात्याने आपण जनतेला सांगावं. कृपा करून गणपती बसलेले आहेत सणासुदीच्या दिवशी अशा पद्धतीने तुम्ही काही पत्रक बाजी करत असाल तर ती चुकीची आहे आणि तात्काळ थांबवा
लवकरच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना निवेदन देऊन बेकायदेशीर बांधकाम सातारा शहरापासून ते यवतेश्वर ते कास रस्त्यापर्यंतचा बेकायदेशीर बांधकाम तोडण्यासाठी तात्काळ पावलं उचलण्यासाठी भेट घेणार आहे
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Fri 2nd Sep 2022 05:09 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Fri 2nd Sep 2022 05:09 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Fri 2nd Sep 2022 05:09 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Fri 2nd Sep 2022 05:09 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Fri 2nd Sep 2022 05:09 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Fri 2nd Sep 2022 05:09 pm
संबंधित बातम्या
-
फलटण शहर व तालुक्यातील निवासी अतिक्रमणे नियमित करणार.मा . खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर
- Fri 2nd Sep 2022 05:09 pm
-
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Fri 2nd Sep 2022 05:09 pm
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मा.खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट..
- Fri 2nd Sep 2022 05:09 pm
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Fri 2nd Sep 2022 05:09 pm
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Fri 2nd Sep 2022 05:09 pm
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Fri 2nd Sep 2022 05:09 pm
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Fri 2nd Sep 2022 05:09 pm
-
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Fri 2nd Sep 2022 05:09 pm













