महाराष्ट्र बोर्डाकडून दहावीचा निकाल जाहीर, एकूण ९३.८३ % विद्यार्थी उत्तीर्ण
Satara News Team
- Fri 2nd Jun 2023 11:29 am
- बातमी शेयर करा
Maharashtra Board 1oth Result 2023: महाराष्ट्र बोर्डाकडून दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन निकाल पाहता येणार आहे. विद्यार्थी बातमीत पुढे दिलेल्या लिंकवरुन आणि खालील स्टेप्स फॉलो निकाल पाहू शकतात.राज्यातून एकूण १५,७७ लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली असून ५३३ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. माध्यमिक बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार दहावीच्या परीक्षेसाठी एकूण १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यामध्ये ८४ हजार ४१६ मुले असून ७३ हजार ६२ मुली आहेत.
निकालाची वैशिष्ट्ये
एकूण ९३.८३ विद्यार्थी उत्तीर्ण
कोकण विभागाचा निकाल ९८.१८ टक्के
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च - एप्रिल २०२३ मध्ये या परीक्षा घेण्यात आल्या होत्या.
दहावीच्या मार्च - एप्रिल २०२३ परीक्षेत बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होणार आहेत.
कुठे पाहाल निकाल?
पुढील वेबसाइटवर पाहता येईल निकाल -
www.mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://ssc.mahresults.org.in
www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
SSC Result 2023 : असा पाहा निकाल
स्टेप १) दहावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जा.
स्टेप २) दहावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप ३) तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरा.
स्टेप ४) दहावीचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Fri 2nd Jun 2023 11:29 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Fri 2nd Jun 2023 11:29 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Fri 2nd Jun 2023 11:29 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Fri 2nd Jun 2023 11:29 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Fri 2nd Jun 2023 11:29 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Fri 2nd Jun 2023 11:29 am
संबंधित बातम्या
-
सांगवी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार ... सभापती शिवांजली भोसले
- Fri 2nd Jun 2023 11:29 am
-
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Fri 2nd Jun 2023 11:29 am
-
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Fri 2nd Jun 2023 11:29 am
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Fri 2nd Jun 2023 11:29 am
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Fri 2nd Jun 2023 11:29 am
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Fri 2nd Jun 2023 11:29 am
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Fri 2nd Jun 2023 11:29 am
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Fri 2nd Jun 2023 11:29 am











