सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी व्हिजन प्लॅनिंग पालकमंत्री शंभूराजे देसाई व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची आढावा बैठक

सातारा : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर,पाचगणी आणि परिसरातीलपर्यटन विषयक विविध विभागाच्या प्रलंबित आणि प्रगतीपथावरील कामांचा आढावा घेण्यासाठी राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री. शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कालSatara News Team एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत महाबळेश्वर, पाचगणी आणि आसपासच्या परिसरातील पायाभूत सुविधांच्या कामांची माहिती घेऊन रस्ते, पूल, नाले यांची कामे वेगाने पूर्ण करण्याबाबत चर्चा करत सूचना केल्या.

सातारा जिल्ह्यातील तापोळा विभागाचा पर्यटन स्थळांच्या दृष्टीने विकास करण्यासाठी त्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. तापोळ्यात पायाभूत सुविधा उभारण्यासोबतच रस्त्यांचे रूंदीकरण, कोयना जलाशयावरील पुलांची उंची वाढवणे या कामांना गती देण्याचा निर्णय घेण्यात आला. कोयना जलायशाच्या बॅकवाटर चा वापर अधिक प्रभावीपणे झाल्यास पर्यटकांना आकर्षित करता येणार आहे. पर्यटन स्थळांच्या विकासासाठी माननीय मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे साहेब यांनी कोट्यवधींचा निधी यापूर्वी मंजूर केला आहे. त्यात अधिकचा निधी आवश्यक असल्यास तोही उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे प्रगतीपथावर असलेली कामे जलद गतीने व वेळापत्रकानुसार पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. 

महाबळेश्वर, पाचगणी व आसपासच्या पर्यटन स्थळांना अद्ययावत सुविधा देऊन देशभरातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध विकास कामे प्राधान्याने मार्गी लावण्याचे आवाहन याप्रसंगी केले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त