श्रावणातील पहिल्या गुरुवारचे राशीभविष्य

आजचे राशी भविष्य 17 ऑगस्ट 2023 : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?
 
मेष राशी : आजचा दिवस तुमच्या आयुष्यात आनंदाचे वातावरण निर्माण करणारा असेल. तुमच्यावर देण्यात आलेली जबाबदारी तुम्ही व्यवस्थित पार पाडाल. कुटुंबात निर्माण झालेले मतभेद दूर होतील. आजचा शुभ रंग - पिवळा.

वृषभ राशी : आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. नव्या कार्याची सुरुवात कराल. आर्थिक देवाण-घेवाण करताना काळजी घ्या. व्यवसाय वाढीसाठी वेळ अनुकूल असेल. आजचा शुभ रंग - केशरी.
 
मिथुन राशी : आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक असेल. तुम्ही कुटुंबातील सदस्याला दिलेले आश्वासन पूर्ण कराल. नव्या नोकरीची संधी चालून येईल. लाईफस्टाईलमध्ये बदल होतील. नवविवाहित जोडप्यांच्या घरी पाहुण्यांचे आगमन होईल. आजचा शुभ रंग - पांढरा.
 
कर्क राशी : खर्चात वाढ होईल. खर्चांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. गरजूंना अन्न, वस्त्र दान करा. एखाद्याकडून उधार घेण्याचा विचार करत असाल तर असे अजिबात करु नका. पाय दुखणे, पाठदुखी किंवा कंबर दुखीची समस्या जाणवेल. आजचा शुभ रंग - निळा.
 
सिंह राशी : कुटुंबात धार्मिक कार्य होतील. नव्या कार्याची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. व्यवसायात चांगला नफा प्राप्त होईल. आरोग्याची काळजी घ्या. आजचा शुभ रंग - जांभळा.
 
कन्या राशी : आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक असणार आहे. आर्थिकस्थितीत सुधारणा होईल. रखडलेले काम मार्गी लागेल. नवीन गाडी खरेदीचा विचार कराल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल. आजचा शुभ रंग - केशरी.
 
तूळ राशी : आजचा दिवस तुमच्या भाग्याच्यादृष्टीने उत्तम असणार आहे. व्यापाऱ्यांना आज चांगला नफा प्राप्त होईल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. आई-वडिलांसोबत धार्मिकस्थळी भेट द्याल. आजचा शुभ रंग - निळा.
 
वृश्चिक राशी : एखाद्या गोष्टीवरुन वाद-विवाद होऊ शकतात. आजचा दिवस धावपळीचा असू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आजचा शुभ रंग - पिवळा.
 
धनु राशी : कामाच्या निमित्ताने दूरचा प्रवास होऊ शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. बऱ्याच दिवसांनी दूरच्या नातेवाईकांचे घरी आगमन होईल. पोटाच्या संबंधित समस्या भेडसावतील. आजचा शुभ रंग - लाल.
 
मकर राशी : आजचा दिवस धावपळीचा असेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. नोकरी करणारे व्यक्ती एखादे पार्ट टाईम काम करण्याचा विचार करतील. आरोग्याकडे लक्ष द्या. वाहन चालवताना काळजी घ्या. आजचा शुभ रंग - जांभळा.
 
कुंभ राशी : शेअर बाजारातून किंवा लॉटरीतून तुम्हाला मोठा नफा प्राप्त होईल. सरकारी योजनेचा लाभ घ्या. कामावर लक्ष द्याल तरच वेळेवर पूर्ण होतील. वडिलधाऱ्यांच्या सल्ल्याने नव्या कार्याची सुरुवात कराल. आजचा शुभ रंग - पांढरा.
 
मीन राशी : अचानक धनलाभ होईल. आर्थिक सुधारणा झाल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. मेहनतीचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. वाहन चालवताना काळजी घ्या. आजचा शुभ रंग - लाल.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला