अल्पवयीन मुलीची घरीच प्रसूती करून जन्मलेल्या बाळाचे शिर धडावेगळे करीत नाल्यामध्ये टाकून खून
अत्याचार करणाऱ्यासह मुलीचा नराधम बापाहि ताब्यातSatara News Team
- Wed 8th Mar 2023 01:55 pm
- बातमी शेयर करा

ढेबेवाडी : वारंवार अत्याचार केल्यानंतर साडेआठ महिन्यांची गर्भवती असलेल्या अल्पवयीन मुलीची घरीच प्रसूती करून जन्मलेल्या बाळाचे शिर धडावेगळे करीत ते टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या घटनेमुळे ढेबेवाडी परिसरात एकच खळबळ उडाली असून ढेबेवाडी पोलिसांनी पीडित मुलीवर अत्याचार करणाऱ्यासह नराधम बापालाही ताब्यात घेऊन अटक केली आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ढेबेवाडी भागातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. त्यातून ती 8 महिने 21 दिवसांची गर्भवती राहिली होती. याप्रकरणी आरोपीवर बाललैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्यात आरोपीला अटक करून पीडित अल्पवयीन मुलीच्या वैद्यकीय तपासणीसाठी तिला रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, मुलीच्या पोटात गर्भ नसल्याचे त्यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सांगितले. दरम्यान, वैद्यकीय अधिकारी आणि पोलिसांनी त्याबाबत मुलीकडे विचारणा केली असता वडिलांनी घरीच प्रसूती केल्याचे तिने माहिती दिली.
प्रसूतीनंतर जन्मलेले बाळ रडत असल्यामुळे शेजाऱ्यांना समजायला नको म्हणून वडिलांनी बाळाचे तोंड दाबून घरातील पारळीने त्याचे शिर धडावेगळे केले. तसेच ते नाल्यामध्ये टाकून देऊन नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मुलीने या प्रकाराबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ मुलीच्या बापावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या घटनेची नोंद ढेबेवाडी पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस उपअधिक्षक विवेक लावंड, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत चौधरी, उपनिरीक्षक दिपज्योती पाटील करीत आहेत.
स्थानिक बातम्या
सातारा न्यूज राशिभविष्य आज ७/७/२०२५ सोमवार
- Wed 8th Mar 2023 01:55 pm
सातारा न्यूज राशिभविष्य शनिवार दि. ०५ जुलै २०२५
- Wed 8th Mar 2023 01:55 pm
सातारा न्यूज राशिभविष्य आज ४/७/२०२५ शुक्रवार
- Wed 8th Mar 2023 01:55 pm
सातारा न्यूज राशिभविष्य ३/६/२०२५ गुरुवार
- Wed 8th Mar 2023 01:55 pm
सातारा न्यूज राशिभविष्य बुधवार दि.०२ जुलै २०२५
- Wed 8th Mar 2023 01:55 pm
शिक्षण प्रसारक संस्थेचे आधारवड संस्था सचिव तुषार पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
- Wed 8th Mar 2023 01:55 pm
संबंधित बातम्या
-
मुलाचा वडिलांवर डोक्यात दगड घालून तलवारीने हल्ला
- Wed 8th Mar 2023 01:55 pm
-
कुमठे गावच्या सरपंचाचा पत्नीस जिवे मारण्याचा प्रयत्न सरपंचावर गुन्हा दाखल
- Wed 8th Mar 2023 01:55 pm
-
कराड तालुक्यात राजकीय चर्चेवेळी युवकावर कोयत्याने वार
- Wed 8th Mar 2023 01:55 pm
-
खूनप्रकरणातील विवाहितेच्या भावांवर गुन्हा दाखल
- Wed 8th Mar 2023 01:55 pm
-
अंजलीचा खुनाचा संशयित पती शुद्धीवर, विवाहितेच्या मृत्यूचे गूढ आज उलगडणार ?
- Wed 8th Mar 2023 01:55 pm
-
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खुन करुन मृतदेह कॉटच्या खाली झाकला कपड्याच्या गाठोड्यांनी
- Wed 8th Mar 2023 01:55 pm
-
अल्पवयीन मुलाचे अपहरण करुन त्यास मारहान केलेल्या नराधमाच्या लोणंद पोलीसांनी आवळल्या मुसक्या
- Wed 8th Mar 2023 01:55 pm
-
माणमध्ये परमिट रूम मध्येही देशी दारूचा ‘सुळसुळाट’
- Wed 8th Mar 2023 01:55 pm