अखेर 2 वर्षांच्या चिमुकलीसह कृष्णा नदीत उडी घेतलेला महिलेचा मृतदेह 7 दिवसांनी सापडला

सातारा  : सातारा तालुक्यातील वडूथ येथील माहेरी आलेल्या एका महिलाने आपल्या दोन वर्षांच्या चिमुरडीसह कृष्णा नदीत उडी घेतली होती. मात्र, गेल्या आठवडाभरापासून या महिलेचा शोध घेण्यात येत होता. आज, अखेर 7 दिवसांनी आत्महत्या केलेल्या महिलेचा मृतदेह घटना घडलेल्या ठिकाणापासून 8 किमी दूरवर आढळून आला आहे.संचिता साळुखे (वय 22) असं या महिलेचं नाव असून 27 जुलै रोजी ही घटना घडली होती. या घटनेनंतर कृष्णा नदीपात्रात शोध मोहिम राबवण्यात आली, त्यावेळी मुलीचा मृतदेह सापडला होता. आता, 7 दिवसांनंतर आईचाही मृतदेह सापडला आहे.


सातारा जिल्ह्यातील वडूथ येथील संचिता साळुंखे (वय 22 वर्षे) महिला काही दिवसांपूर्वी आपल्या माहेरी आली होती. माहेरी येताना या महिलेने आपल्या दोन वर्षांच्या मुलीला सोबत आणले होते. मात्र, कौटुंबिक कारणास्तव या महिलने 27 जुलै रोजी आपल्या दोन वर्षांच्या चिमुकलीसह कृष्णा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेनं परिसरात शोककळा पसरली, तसेच आईच्या या कृत्यामुळे चिमुकलीला का शिक्षा?, असे म्हणत अनेकांना शोक, सहवेदना व्यक्त केल्या.

दरम्यान, 27 जुलै रोजी झालेल्या शोधमोहिमेत चिमुरड्या अक्षिताचा मृतदेह बचाव बथकाला सापडला होता. मात्र, आई संचिता तेव्हापासून बेपत्ता होती. आज महाबळेश्वर ट्रेकर्सच्या युवकांना घटनास्थळापासून आठ किलो मिटरवरील गोजेगाव गावाच्या हद्दीत मृतदेह पाण्यावर तरंगत असताना दिसून आले. याबाबत, त्यांनी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर, हा मृतदेह पाण्याबाहेर काढून नातेवाईकांना देण्यात आला.

आम्हाला जोडण्यासाठी
esataranews.com

स्थानिक बातम्या

आकृतीबंधाचा शासन निर्णय  दोन वर्षांपूर्वीच  निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

आकृतीबंधाचा शासन निर्णय दोन वर्षांपूर्वीच निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

शिक्षण प्रसारक संस्था  करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शिक्षण प्रसारक संस्था करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या  हस्ते संपन्न...

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या हस्ते संपन्न...

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त