डाळमोडी येथील महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू

वडूज : डाळमोडी ता. खटाव येथील माने मळा शिवारात असलेल्या ओढ्यावरील पाण्यात बुडून रंजना लालासो शिंदे (वय ४० ) यांचा  आकस्मित मृत्यू झाल्याची नोंद वडूज पोलीस ठाण्यात झाली आहे.
        याबाबत वडूज पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की,शनिवार दि. २७ रोजी डाळमोडी येथील रंजना लालासाहेब शिंदे या माने मळा शिवारातील ओढ्यावर धुणे घुण्यासाठी  गेल्या होत्या. दुपारी दीड ते पाच वाजण्याच्या दरम्यान रंजना शिंदे या ओढ्यावरील वाहत्या पाण्यात बेशुध्द अवस्थेत पडलेल्या आढळून आल्या. गावकऱ्यानी त्यांना उपचारासाठी वडूज येथे खाजगी दवाखान्यात घेऊन आले असता अधिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले . तपासणी अंती त्यांचा मृत्यू झाल्याचे संबधीत वैद्यकीय अधिकारी यांनी घोषीत केले . रंजना शिंदे यांच्या  अकस्मात मृत्यू मुळे डाळमोडी गावावर शोककळा पसरली . त्यांचा पश्चात पती , सासु व दोन मुले असा परिवार आहे .  
        सदर घटनेची खबर गोरख परबती शिंदे यांनी वडूज पोलीस ठाण्याला दिली . यावरून अकस्मात मृत्यू म्हणून वडूज पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पोलीस निरिक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रशांत पाटील अधिक तपास करीत आहेत .

आम्हाला जोडण्यासाठी
esataranews.com

स्थानिक बातम्या

आकृतीबंधाचा शासन निर्णय  दोन वर्षांपूर्वीच  निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

आकृतीबंधाचा शासन निर्णय दोन वर्षांपूर्वीच निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

शिक्षण प्रसारक संस्था  करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शिक्षण प्रसारक संस्था करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या  हस्ते संपन्न...

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या हस्ते संपन्न...

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त