श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे शाहू महाराज भोसले यांचे दुःखद निधन
उद्या अदालत वाडा येथे सकाळी ९ वाजता अंत्यदर्शन व १ वाजता अदालत वडयापासून अंतयात्राSatara News Team
- Tue 13th Sep 2022 02:47 pm
- बातमी शेयर करा
सातारा : छत्रपती घराण्याचे वारसदार आणि सातारचे माजी नगराध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी दुःखद निधन झाले. पुण्याच्या जहांगिर हॅास्पिटलमध्ये गेल्या दोन आठवड्यापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.
उद्या अदालत वाडा येथे सकाळी ९ वाजता अंत्यदर्शन व १ वाजता अदालत वडयापासून अंतयात्राशांत संयमी सुसंस्कृत व आपल्या साधेपणाने ओळखले जाणारे सातारचे राजे म्हणजे श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले त्यांचा जन्म 23 एप्रिल 1947 साली झाला. साहित्य कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक कार्यात त्यांचे भरीव योगदान होतं. छत्रपती शिवाजीराजे भोसले यांनी सलग सहा वर्ष शाहू नगरीचे नगराध्यक्ष म्हणून आपली कारकीर्द गाजवली. 15 मे 1985 ते 16 डिसेंबर 1991 पर्यंत ते शाहू नगरीचे नगराध्यक्ष होते त्यांच्या काळात त्यांनी समाज उपयोगी विविध काम केली. सातारच्या राजघराण्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंह राजे यांचे वैर ज्यावेळेस विकोपाला गेले होते त्यावेळेस दोघांना एकत्र आणून राजघराण्यातील वैरत्व संपवण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला हे सातारकर कधीच विसरू शकत नाहीत.त्यांना खेळाविषयी प्रचंड आवड होती त्यामुळेच महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन असोसिएशनचे ते राज्य उपाध्यक्ष होते तसेच शिक्षण क्षेत्रात ही आरे गावच्या श्री भैरवनाथ शिक्षण संस्थे चे ते अध्यक्ष म्हणून कार्यरत होते, शिवतेज माध्यमिक विद्यालय आरे या संस्थेची उल्लेखनीय कार्य जे आजपर्यंत चालू आहे त्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे.
श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज सेवाधाम अग्नि मंदिर करंजे यांचे ते कार्याध्यक्ष होत.श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले हे गेले 75 वर्ष साताऱ्यातील आदालत वाडा येथे राहत होते तो आदालत वाडा हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून न्यायनिवाडा करणारा वाडा म्हणून सुपरिचित होता व आज देखील आहे. आजही या वाड्यातून दिलेला शब्द अथवा आदेश हा सातारकर सन्मानपूर्वक अंतिम म्हणतात.अशा या सर्वसामान्यांच्या लोकप्रिय राजाला म्हणजेच श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली
स्थानिक बातम्या
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Tue 13th Sep 2022 02:47 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Tue 13th Sep 2022 02:47 pm
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Tue 13th Sep 2022 02:47 pm
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Tue 13th Sep 2022 02:47 pm
संबंधित बातम्या
-
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Tue 13th Sep 2022 02:47 pm
-
कोळकी फलटण येथील पुलाच्या दर्जेदार कामासाठी अभिजीत निंबाळकर यांची पाहणी
- Tue 13th Sep 2022 02:47 pm
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचाराचा नवा फॉर्म्युला.
- Tue 13th Sep 2022 02:47 pm
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Tue 13th Sep 2022 02:47 pm
-
CPF FRIENDS COMMANDO FORCE FOUNDATION महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी तात्याबा वाघमोडे यांची नियुक्ती
- Tue 13th Sep 2022 02:47 pm
-
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Tue 13th Sep 2022 02:47 pm










