महाबळेश्वर मधील पर्यटन स्थळांना असलेली इंग्रज अधिकाऱ्यांची नावे बदलून क्रांतिकारकांची नावे देण्याबाबत भाजप व हिंदू एकता समितीच्या वतीने महाबळेश्वर तहसीलदारांना निवेदन

A statement to Mahabaleshwar Tehsildar Sushma Choudhary-Patil on behalf of BJP and Hindu Ekta Samiti regarding changing the names of British officials to the names of revolutionaries on the tourist spots in Mahabaleshwar taluka.
यंदाचे साल हे स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष म्हणून गणले जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर क्रांतिकारकांच्या पराक्रमाची दखल घेऊन इंग्रज अधिकाऱ्यांची नावे असलेल्या तालुक्यातील पर्यटनस्थळांना देशातील शूर क्रांतिकारकांची नावे देण्यात यावी अशी जिल्हयातील जनतेची मागणी आहे. तरी सदर मागणीचा विचार करून दिनांक 15 ऑगस्ट अगोदर आपण सदर कार्यवाही पूर्ण करावी ही विनंती निवेदनात करण्यात आली आहे

पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील पर्यटन स्थळांना असलेली इंग्रज अधिकाऱ्यांची नावे बदलून क्रांतिकारकांची नावे देण्याबाबत भाजप व हिंदू एकता समितीच्या वतीने महाबळेश्वर तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात असे म्हटले आहे की देशाला स्वातंत्र्य मिळवून तब्बल 75 वर्ष उलटून गेलीत. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात कित्येक क्रांतिकारकांनी बलिदानाची आहुती दिली. त्यांच्या असीम त्यागामुळे देश इंग्रजांच्या जोखडातून मुक्त झाला. इंग्रज देश सोडून 75 वर्ष उलटून देखील महाबळेश्वर तालुक्यातील अनेक पर्यटनस्थळांना आजदेखील इंग्रज अधिकान्यांच्या नावाने ओळखले जातात.
यंदाचे साल हे स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष म्हणून गणले जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर क्रांतिकारकांच्या पराक्रमाची दखल घेऊन इंग्रज अधिकाऱ्यांची नावे असलेल्या तालुक्यातील पर्यटनस्थळांना देशातील शूर क्रांतिकारकांची नावे देण्यात यावी अशी जिल्हयातील जनतेची मागणी आहे. तरी सदर मागणीचा विचार करून दिनांक 15 ऑगस्ट अगोदर आपण सदर कार्यवाही पूर्ण करावी ही विनंती निवेदनात करण्यात आली आहे.यावेळी भाजपा प्रदेश सचिव व हिंदू एकता समितीचे अध्यक्ष विक्रम पावसकर, प्रदेश सदस्य भरत पाटील,  सातारा जिल्हा सरचिटणीस सचिन घाडगे, सातारा जिल्हा उपाध्यक्ष तानाजी भिलारे, मनोज कलापट,उषाताई ओंबळे, सातारा जिल्हा चिटणीस सुरेश निंबाळकर, विजयराव भिलारे,मंगेश उपाध्याय, मधुकर बिरामणे, जिल्हा कामगार आघाडी सनी मोरे, महाबळेश्वर तालुका सरचिटणीस सुनील जाधव, अनिल भिलारे, जगन्नाथ भिलारे,करण जाधव,ओंकार पवार,अक्षय सपकाळ,गणेश कारंडे,यूवा मोर्चा सचिव तूषार मोरे, रूषि सपकाळ,अक्षय कारंडे,रोहीत सालेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त