पण भाऊ नसला म्हणून काय झालं ? दीदीचं माझी रक्षणकर्ती म्हणून बांधते तिला राखी
Satara News Team
- Tue 20th Aug 2024 12:56 pm
- बातमी शेयर करा
वडूज : बहिणीला राखी बांधत तिच्या मोठ्या बहिणीने घेतली छोट्या बहिणीची रक्षणाची जबाबदारी. बंधनाचा हा धागा हाती बांधला. या राखीच्या धाग्याच्या बंधनातून बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी आता बहिणीनेच स्वीकारली आहे.
रक्षाबंधन म्हटले, की बहीण भावाच्या बंधनांचा सण ! बहिणीच्या रक्षणाची शपथ देऊन बहीण राखीचा धागा भावाच्या हाती बांधते आणि सदैव माझ्या
पाठीशी उभे राहण्याचे वचन भावाकडून घेते मात्र बहिणीं- ला भाऊच नसल्याने निराश न होता बहीणच भावाची भूमिका बजावत आहे. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वडूज येथील कु.रविना आनंदकुमार यादव, व कु. अमृता आनंदकुमार यादव या दोन बहिणींना भाऊ नाही. मात्र भाऊ नसल्याची खंत न ठेवता एकमेकींना राखी बांधून साजरी केली रक्षाबंधन.
आम्हाला कुणी भाऊ नाही. आम्ही केवळ दोघीच बहिणी; पण भाऊ नसला म्हणून काय झालं? माझी काळजी घेणारी, सुख-दु:खात वाटेकरी असणारी, मदतीला कायमच धावून येणारी, ताटातला मायेचा घास खाऊ घालणारी माझी ‘दीदी’ हीच माझं सर्वस्व आहे. तिचं माझी रक्षणकर्ती असल्याने मी तिलाच राखी बांधते... हे उद्गार आहेत एका छोट्या बहिणीचे. ज्यांना भाऊ नाही अशा असंख्य छोट्या बहिणींनी मोठ्या बहिणीलाच राखी बांधून राखी पौर्णिमेचा सण साजरा करा असे म्हणत स्त्री-पुरुष समानतेचा एक सुंदर संदेश दिला आहे.
भावा-बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक असलेला राखी पौर्णिमेचा सण सोमवारी (दि. १९) रोजी सर्वत्र उत्साहात साजरा झाला. याच दिवशी बहीण भावाचे औक्षण करून त्याला राखी बांधत प्रेमाचे नाते अधिक दृढ करते. ‘राखी’ या शब्दातच ‘रक्षण कर’, राख (राखणकर्ता)म्हणजे ‘सांभाळ’ कर असा त्यामागे अर्थ दडला आहे. भावाच्या मनगटावर राखी बांधून बहिणी एकप्रकारे भावाला रक्षण करण्यास सांगतात; पण अशी असंख्य कुटुंब आहेत, ज्यांच्या घरात फक्त मुली आहेत. भाऊ नसल्याने आम्ही राखी पाैर्णिमेचा सण कधीच साजरा करू शकत नाही का, असा प्रश्न असंख्य बहिणींना पडतो.
मामे, आत्ते, मावस असे अनेक भाऊ प्रत्येक बहिणीलाच असतात. पण सख्खं आपलं असं कुणीतरी बहिणींना हवं असतं. त्यातूनच ज्यांना भाऊ नाही अशा अनेक बहिणींनी त्यांचा मोठ्या बहिणींना राखी बांधून ही पौर्णिमा साजरी करावा असा अनोखा पर्याय समोर आणला.
ज्या कुटुंबांमध्ये दोन किंवा अधिक बहिणी असतात तिथं मोठी मुलगी हीच घराची कर्ती असते. संपूर्ण कुटुंबाची अगदी सासर-माहेरची जबाबदारीही ती सक्षमपणे पेलते. मग तिलाच का नको भावाचा दर्जा द्यायला, असा विचार बहिण करू लागली आहे. एकविसाव्या शतकात हे स्त्री-पुरुष समानतेच्या दिशेने पडलेले एक अभिनव पाऊलच म्हणावे लागेल!
आम्हाला भाऊ नसल्याने राखी पौर्णिमेच्या दिवशी आम्ही उदास असायचो.मम्मी, आम्ही कुणाला राखी बांधणार, अशी सारखी विचारणा आम्ही मम्मी पप्पांकडे करायचो. आमचे हिरमुसलेले चेहरे बघून त्यांना ही वाईट वाटायचे.म्हणून आम्हीच एक मार्ग काढला. आम्हीच एकमेकींना राखी बांधायची. त्या दिवसापासून आम्ही बहिणीच हा दिवस आनंदात साजरा करतो.
आम्ही दोन बहिणी. भाऊ नाही याची खंत नाही; पण राखी पौर्णिमा आणि भाऊबीज हे सण जणू आमच्यासाठी नाहीत असे वाटायचे. शेवटी मीच मग लहान बहिणीला म्हणाले की, तू मला भाऊ मानून राखी बांध. काही नाती खूप अनमोल असतात, हातातील राखी मला याची कायम आठवण करून देत राहतील..तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये, आणि आलच तर त्याला आधी मला सामोरे जावे लागेल. असे वचन देत एकमेकींबरोबर आम्ही हा सण आनंदाने साजरे करतो.-(मोठी बहीण-रविना)
तूच माझा आधार तूच माझं सर्वस्व देवाचे आभार तुझ्या रुपाने दीदी मला दिला मोठा आधार राखी पौर्णिमेच्या तुला हार्दिक शुभेच्छा -(छोटी बहीण-अमृता)असे म्हणत साजरी केली राखीपौर्णिमा.
स्थानिक बातम्या
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Tue 20th Aug 2024 12:56 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Tue 20th Aug 2024 12:56 pm
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Tue 20th Aug 2024 12:56 pm
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Tue 20th Aug 2024 12:56 pm
संबंधित बातम्या
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Tue 20th Aug 2024 12:56 pm
-
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Tue 20th Aug 2024 12:56 pm
-
कोळकी फलटण येथील पुलाच्या दर्जेदार कामासाठी अभिजीत निंबाळकर यांची पाहणी
- Tue 20th Aug 2024 12:56 pm
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचाराचा नवा फॉर्म्युला.
- Tue 20th Aug 2024 12:56 pm
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Tue 20th Aug 2024 12:56 pm
-
CPF FRIENDS COMMANDO FORCE FOUNDATION महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी तात्याबा वाघमोडे यांची नियुक्ती
- Tue 20th Aug 2024 12:56 pm










