कण्हेर डावा कालव्याच्या पाण्यावर बेवारस मृतदेह

सातारा : कण्हेर डावा कालव्याच्या पाण्यावर बेवारस मृतदेह आढळून आल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 9 ऑगस्ट रोजी पाटखळ माथा, ता. सातारा येथून जाणाऱ्या कण्हेर डावा कालव्याच्या पाण्यावर एक 35 ते 40 वर्षे वयोगटातील पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला आहे. त्याच्या अंगावर काळपट रंगाचे बनियन, खाकी रंगाचा चौकडा शर्ट, निळ्या रंगाचे जर्किन व काळ्या रंगाची नाईट पॅन्ट आहे. याबाबतची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दळवी करीत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त