इंदोली,पाल उपसा सिंचन योजना 50 मीटर वरून 100 मीटर हेड करणार : महेशदादा शिंदे

मनोजदादांचे विशेष प्रयत्न

देशमुखनगर : पुणे येथील सिंचन भवन येथे आज कराड उत्तर मधील प्रलंबित पाणी प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी उभागीय आयुक्तांसह पाटबंधारे विभागातील सर्व प्रमुख अधिकारी यांची बैठक कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष मा.आ. महेशजी शिंदे  यांच्या अध्यक्षखाली पार पडली यावेळी मनोजदादा घोरपडे, विक्रम पावसकर, कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हणमंत गुणाले व अधिकारी वर्ग उपस्थित होते. इंदोली उपसा सिंचन योजना व पाल उपसा सिंचन योजना गेली अनेक वर्ष अस्तित्वात असून 50 मीटर हेड असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्याचा लाभ  होत नाही. त्यामुळे 50 मीटर हेड वरून 100 मीटर हेड करण्यासाठी शासन दरबारी प्रस्ताव पाठवून या योजना लवकरात लवकर 100 मीटर हेडने पूर्ण केल्या जातील असा विश्वास कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष मा. ना.महेशदादा शिंदे यांनी पुणे येथील बैठकीत व्यक्त केला.
   इंदोली,पाल उपसा सिंचन योजने बरोबरच हणबरवाडी  धनगरवाडीयोजनेचा पहिल्या टप्प्याच्या कामाचे उदघाटन पुढच्या महिन्यांमध्ये करण्याचे ठरले असून टप्पा क्रमांक दोन मधून गायकवाडवाडी तलावात पाणी सोडणे संदर्भात ही या ठिकाणी चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर धनगरवाडी योजनेतून नागझरी गावासाठी पाणी देणे संदर्भात या ठिकाणी चर्चा करण्यात आली यावेळी सुरेश तात्या पाटील,दिनकर पाटील आबा,संतोष पाटील, महेश चंदुगडे, अशोक यादव, रामदास बाबर, अंकुश सप्रे, विकास निकम आदी उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त