भाग्यश्री पवार / फरांदे यांनी स्वीकारला सातारा जिल्हा कृषी अधिकारी म्हणून पदभार
Satara News Team
- Fri 7th Apr 2023 10:37 am
- बातमी शेयर करा
सातारा ः येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीपदी भाग्यश्री पवार-फरांदे यांची नियुक्ती झाली असून गुरूवारी त्यांनी पदभार स्विकारला. अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांची बदली सिंधुदुर्ग येथे झाली. श्रीमती पवार-फरांदे यांचे मुळगाव सातारा जिल्ह्यातील आरफळ असून सासर आनेवाडी आहे.त्यांचे शिक्षण एम.एस्सी अॅग्री. असून 2009 मध्ये स्पर्धा परिक्षेतून वर्ग एक साठी त्यांची निवड झाली. अलिबाग येथे त्यांनी कर्जत, महाड परिसरातील पाणलोटाची कामे मार्गी लावली. त्यानंतर कोल्हापूर येथे आत्मा प्रकल्प उपसंचालक म्हणून कार्यभार संभाळला. नविन्यपूर्ण उपक्रम राबविले. शेतक-यांचे गट स्थापन करून 14 शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना, शासकीय योजना तळागाळापर्यत पोहचविणे, दुर्गम भागातील लोकांसाठी खादी कमिशनकडून दीड कोटीचा मधप्रकल्प मंजूर करून आणून तो यशस्वीपणे सुरू करणे, कोल्हापूर येथे कृषी उपसंचालक म्हणुनही त्यांनी काम केले. येथे त्यांनी ऊस उत्पादकता वाढ, ऊस नर्सरी विस्तार, परवाने प्रक्रिया तसेच आदर्श ग्राम ससंद मधील तीन गावाचे काम पाहिले तसेच प्रक्रीया उद्योग उभारणीला चालना दिली. गडहिग्लंज येथे उपविभागीय कृषी अधिकारी पदी त्यांनी डोंगरी भागात कृषी उत्पन्न वाढीसाठी काम केले. त्यानंतर पुणे स्मार्ट प्रकल्पात नोडल अधिकारी म्हणून कार्यभार संभाळला. आता त्या साताऱ्यात रूजू झाल्या आहेत.कृषी उत्पादकता वाढ तसेच शेतकरी कुटुंबातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना शेतमाल प्रक्रिया व्यवसायात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे श्रीमती फरांदे यांनी सांगितले.
स्थानिक बातम्या
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Fri 7th Apr 2023 10:37 am
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Fri 7th Apr 2023 10:37 am
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Fri 7th Apr 2023 10:37 am
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Fri 7th Apr 2023 10:37 am
म्हसवड नगरपरिषदेत सूर्यवंशी दाम्पत्य ठरले ’धुरंदर’!
- Fri 7th Apr 2023 10:37 am
सातारा नगरपरिषद निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान
- Fri 7th Apr 2023 10:37 am
संबंधित बातम्या
-
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Fri 7th Apr 2023 10:37 am
-
पुसेसावळी येथे लागोपाठ चोऱ्यांचे सत्र सुरूच, पोलिस प्रशासन मात्र हतबल!
- Fri 7th Apr 2023 10:37 am
-
सहा.पो.नि. अक्षय सोनवणे यांचा सराईत गुन्हेगारांना दणका
- Fri 7th Apr 2023 10:37 am
-
पुसेसावळीतील सावकारी च्या 'उदय' मुळे कळंबीतील एक कुटुंब 'अस्त' होण्याच्या मार्गावर...
- Fri 7th Apr 2023 10:37 am
-
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Fri 7th Apr 2023 10:37 am
-
वडूज येथील रास्तभाव दुकानाबाबत दोष आढळल्याने नोटीस.
- Fri 7th Apr 2023 10:37 am
-
औंध पोलिस ठाण्याचे कारभारी मतेंवर गोरे अंकुश ठेवणार? कि पोलिस अधीक्षक दोषी ठरवणार?
- Fri 7th Apr 2023 10:37 am
-
जिल्हा परिषद नगररचना विभागात रंगली सामूहिक बिर्याणीची पार्टी.
- Fri 7th Apr 2023 10:37 am












