अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांच्या कारभाराची सखोल चौकशी करणार.... विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार
Satara News Team
- Mon 27th May 2024 06:44 pm
- बातमी शेयर करा
सातारा ; सातारा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांनी मुख्याधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्या बदलीनंतर काही काळ सातारा जिल्हा परिषदेचा मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार स्वीकारला होता त्या कार्यकाळात महादेव घुले यांनी सरकारी अध्यादेश काढले असून त्यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषद मधील सर्व विभागातील विकास कामांच्या प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या महाराष्ट्र शासनाच्या अधिनियमानुसार ऑनलाइन बदल्या झाल्या असताना आपल्या मर्जीतील शासकीय कर्मचाऱ्यांची आर्थिक देवाण-घेवाण करून पुन्हा नियुक्त्या करण्यात आल्या असून याची सखोल चौकशी करण्याची मागणी ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख गणेश अहिवळे यांनी पुणे विभागीय आयुक्त डॉ. श्री चंद्रकांत पुलकुंडवार यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे..
2023-24 अंतर्गत बांधकाम विभागातील कामवाट केलेल्या कामांची व कामवाट समितीची देखील सखोल चौकशी यामध्ये करण्यात यावी, जिल्हा परिषद मध्ये असा पायंडा पडला आहे की काही ठेकेदारांना हाताशी धरून आपण स्वतः म्हणजे त्या विभागातील सक्षम अधिकारी भागीदार करून आपल्या मर्जीतल्या ठेकेदारांना कामे दिले जात आहेत, त्याचबरोबर आरोग्य विभागातील देखील अशाच प्रकारे राजरोसपणे उघड भ्रष्टाचार सुरू आहे, शिक्षण विभागातील ऑनलाईन शासनाकडून झालेला शिक्षक बदल्यांचे परस्पर फेरफार करून तात्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी बदल्या केल्या.. या संपूर्ण प्रक्रियेची सखोल चौकशी करण्याची मागणी निवेदनाद्वारे अहिवळे यांनी केली आहे अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय.
यावेळी सखोल चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना दिला.
स्थानिक बातम्या
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Mon 27th May 2024 06:44 pm
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Mon 27th May 2024 06:44 pm
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Mon 27th May 2024 06:44 pm
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Mon 27th May 2024 06:44 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Mon 27th May 2024 06:44 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Mon 27th May 2024 06:44 pm
संबंधित बातम्या
-
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Mon 27th May 2024 06:44 pm
-
सात कोटींचे काम, वर्षभराची दिरंगाई! कुडाळमध्ये रस्ता-गटरचे अर्धवट काम
- Mon 27th May 2024 06:44 pm
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Mon 27th May 2024 06:44 pm
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Mon 27th May 2024 06:44 pm













