कंटेनरच्या धडकेत दुचाकीवरील युवती ठार

सातारा : पुणे - बंगळूर महामार्गावर चिंचणी फाटा (पाटेश्वरनगर) नजीक दुचाकीला पाठीमागून आलेल्या कंटेनरने जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील एक युवती जागीच ठार झाली तर एक यूवती गंभीर जखमी झाली आहे.

 बुधवारी दुपारी हा अपघात झाला. साक्षी सचिन देशमुख, वय २१, रा. तारळे, ता. पाटण असे मृत तरुणीचे नाव आहे तर तिची मैत्रिण साक्षी अमृत ढाणे, वय २१, रा. पाडळी, ता. जि. सातारा ही गंभीर जखमी झाली आहे. दुचाकीला धडक दिलेला कंटेनरचा चालक कंटेनर रस्त्यावर सोडून पळून गेला. या दोघीही साताऱ्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत होत्या. धडक एवढी जोरदार होती, की साक्षी देशमुख ही जागीच ठार झाली. साक्षी ढाणे हिच्या पायाला व हाताला गंभीर दुखापत झाली आहे. 

घटनास्थळी बोरगाव पोलीस ठाण्याचे स.पो.नि. धोंडिराम वाळवेकर व महिला पोलीस उपनिरीक्षक स्मिता पाटील यांनी भेट देवून पंचनामा केला..

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त