प्रेम असून देखील खासदारकीला उदयनराजे का पडले.आत्मचिंतन करावे... आ.शिवेंद्रराजेचा टोला
Satara News Team
- Sat 11th Mar 2023 04:24 pm
- बातमी शेयर करा
सातारा :लोकांचे प्रेम असून देखील खासदारकीला उदयनराजे भोसले पडले. त्यामुळे त्यांनी आत्मचिंतन करावे आणि पेटिंग काढण्यापेक्षा लोकांची कामे करावीत, असा टोला आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी लगावला.
लोकांची कामे केली म्हणूनच मी आमदारकीला निवडून आलो. परंतु लोकांचे प्रेम असून देखील खासदारकीला उदयनराजे भोसले पडले. त्यामुळे त्यांनी आत्मचिंतन करावे आणि पेटिंग काढण्यापेक्षा लोकांची कामे करावीत, असा टोला भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी लगावला.शिवेंद्रराजे भोसले यांनी आज सातारा येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खा. उदयनराजे भोसले यांच्या पेंटींगच्या प्रकारावरून पुन्हा निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले कि, खरं पाहिलं तर शहरात अथवा आपल्या असलेल्या मतदार संघात वाद – विवाद घडू नये, येथील वातावरण कोणत्याही कारणांनी तापू नये जेणेकरून प्रशासनावर दबाव निर्माण होईल. हे पाहण्याचे काम लोकप्रतिनिधींचे असते. शहर तणावमुक्त आणि सर्वचबाबतीत चांगले राहावे यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे आवश्यक असते. मात्र, शहरात जर तणाव निर्माण झाल्यास त्याला लोकप्रतिनिधी जबाबदार असतात.
आपण कुणाला वेड्यात काढत आहे हे सर्वांना समजते. जनतेलाही ते दिसत असते. माझ्याबाबत सांगितले गेले कि, तुम्हीही लोकांची कामे करा म्हणजे तुमचेही पेंटिंग काढले जाईल. मात्र, मला काही केल्या पेंटिंग काढून घ्यायची हौस नाही. मी लोकांची आणि येथील मतदार संघातील कामे केली म्हणूनच विधानसभेत निवडून आलो आहे. आणि काहींना पराभव पत्करावा लागला. काहीजण लोकांचं एवढं प्रेम असून देखील निवडणुकीत पडले. खरं तर हा आत्मचिंतनाचा विषय आहे. ते आत्मचिंतन त्यांनी करावे. पेंटिंग काढण्यापेक्षा कामाच्या माध्यमातून आपले नाव झाले पाहिजे. संबंधित पेंटिक त्रयस्थ लोकांनी काढले असते तर आम्ही समजून घेतले असते. मात्र, माझ्याच गाडीत मागे बसणाऱ्यांनी माझंच पेंटिंग काढायचे, या गोष्टीला काय अर्थ आहे.कुठेतरी नगरपालिकेच्या निवडणुका नजरेसमोर ठेऊन मी चार पेंटींग काढले कि मला उमेदवारी मिळेल असा गोष्टी केल्या जात आहेत. त्यापेक्ष अशी लोक असण्यापेक्षा नसलेली बरी. मी माझेच पेंटिंग काढायला लावायचे आणि जनतेचं माझ्यावर खूप प्रेम आहे हे दाखवायचे हा म्हणजे झोपलेला आहे असे दाखवायचे झोपेचे सोंग घ्यायचे असे दाखवण्यासारखे झाले त्यातील हा सर्व प्रकार असल्याचा टोला शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजे भोसले यांना लगावला आहे.
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Sat 11th Mar 2023 04:24 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Sat 11th Mar 2023 04:24 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Sat 11th Mar 2023 04:24 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Sat 11th Mar 2023 04:24 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Sat 11th Mar 2023 04:24 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Sat 11th Mar 2023 04:24 pm
संबंधित बातम्या
-
मतदारसंघ पुनर्रचना अजून झालीच नाही; मग शशिकांत शिंदेंची मुंबईत ‘राजकीय मोर्चेबांधणी’ कशासाठी?
- Sat 11th Mar 2023 04:24 pm
-
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Sat 11th Mar 2023 04:24 pm
-
कदमांना “ससा” म्हणत सपकाळांनी टोला मारला; पण आंबेघरचा पराभव आठवताच सोशल मीडियाने सपकाळांनाच घेरले!
- Sat 11th Mar 2023 04:24 pm
-
स्वातंत्र्यदिनी महाबळेश्वरच्या स्वच्छता व पाणीपुरवठ्याला नवी ताकद!
- Sat 11th Mar 2023 04:24 pm
-
आखाडे ठरावाचा राग अनावर; राजे गटाच्या कार्यकर्त्यावर हल्ला, मेढा पोलीस ठाण्यात राजकीय नेत्यांची गर्दी!
- Sat 11th Mar 2023 04:24 pm
-
भाजप बैठकीत वादाचा भडका; गोळे–मानकुमरे आमनेसामने, हातगेघर ठरावावरून आरोप-प्रत्यारोप
- Sat 11th Mar 2023 04:24 pm
-
हुजरेगिरीची कला : काल शशिकांत शिंदे, आज बाबाराजे!
- Sat 11th Mar 2023 04:24 pm












