सातारा रेल्वेस्थानकात बांधकाम सुरू असताना लॉप्ट कोसळून कामगाराचा मृत्यू
सातारा रेल्वेस्थानकात बांधकाम सुरू असताना लॉप्ट कोसळून कामगाराचा मृत्यूSatara News Team
- Mon 27th May 2024 12:54 pm
- बातमी शेयर करा

सातारा : सातारा रेल्वेस्थानकात बांधकाम सुरू असलेल्या पार्सल विभागाच्या इमारतीचा लॉप्ट कोसळून परप्रांतीय कामगाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी ३ च्या सुमारास घडली. अछ्छेलाल अमीरे कोल (वय २३, रा. सिध, मध्य प्रदेश) असे मृत कामगाराचे नाव आहे.सातारा रेल्वेस्थानकात पार्सल कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीच्या खिडक्या, दरवाजाचे काँक्रिटचे लाॅफ्ट तयार करण्यात आले. ९ इंची भिंतीच्या दरवाजावर ५ फूट लांब ३ फूट रुंद तसेच चार इंच जाडीचा अंदाजे २०० किलो वजन असलेला सिमेंटचा लाॅप्ट बसविण्यात आला होता. या लाॅप्टखाली लावण्यात आलेला प्लायवूड कामगार अछ्छेलाल कोल हा काढत होता. त्यावेळी अचानक सिमेंटचा दोनशे किलोचा लाॅप्ट त्याच्या अंगावर पडला. यात कोल याचा जागीच मृत्यू झाला.
दुसरी दुर्घटना
पंधरा दिवसांपूर्वीही याच इमारतीच्या बांधकामावरील लाॅप्ट कोसळून एक कामगार जखमी झाला होता. त्याचे हातपाय फ्रॅक्चर झाले. दुसऱ्यांदा हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
दोषीवर गुन्हा दाखल करा..
इमारतीचे बांधकाम घेतलेले मुख्य ठेकेदार कंपनी मुंबईस्थित असून, त्या कंपनीने दुसरा ठेकेदार नेमला आहे. त्या ठेकेदाराने तिसऱ्या ठेकेदाराला लेबर वर्कवर काम दिले आहे. सध्या हे काम थर्ड पार्टी ठेकेदार करत आहे. याची चाैकशी व्हावी. मयत कामगाराच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची मदत रेल्वे आणि ठेकेदार यांनी द्यावी. सर्व कामगारांचा अपघाती विमा उतरवण्यात यावा. या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सातारा रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष व सातारा रेल्वे स्टेशनचे सल्लागार समितीचे माजी सदस्य विकास कदम यांनी केली आहे.
स्थानिक बातम्या
सातारा न्यूज राशिभविष्य आज ७/७/२०२५ सोमवार
- Mon 27th May 2024 12:54 pm
सातारा न्यूज राशिभविष्य शनिवार दि. ०५ जुलै २०२५
- Mon 27th May 2024 12:54 pm
सातारा न्यूज राशिभविष्य आज ४/७/२०२५ शुक्रवार
- Mon 27th May 2024 12:54 pm
सातारा न्यूज राशिभविष्य ३/६/२०२५ गुरुवार
- Mon 27th May 2024 12:54 pm
सातारा न्यूज राशिभविष्य बुधवार दि.०२ जुलै २०२५
- Mon 27th May 2024 12:54 pm
शिक्षण प्रसारक संस्थेचे आधारवड संस्था सचिव तुषार पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
- Mon 27th May 2024 12:54 pm
संबंधित बातम्या
-
वीजेचा शॉक लागून २ वारकऱ्यांचा दुर्दैवी अंत
- Mon 27th May 2024 12:54 pm
-
मुलीचा प्रेमविवाह; धक्क्यातून आईने जीवन संपवले
- Mon 27th May 2024 12:54 pm
-
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली!
- Mon 27th May 2024 12:54 pm
-
पुसेसावळी येथील युवकाने गळफास घेऊन संपवली जिवनयात्रा?.
- Mon 27th May 2024 12:54 pm
-
अहमदाबादमध्ये विमान दुर्घटना; पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण...,
- Mon 27th May 2024 12:54 pm
-
पुसेसावळी येथे झालेल्या अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू
- Mon 27th May 2024 12:54 pm
-
प्रीतिसंगमावर क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या घरातील सुनेला घोणसच्या पिल्लाने घेतला चावा
- Mon 27th May 2024 12:54 pm
-
नागठाणेजवळ टेम्पोच्या धडकेत बापलेकीचा मृत्यू
- Mon 27th May 2024 12:54 pm