पाचगणी शहरातील विविध भागा त मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला

पांचगणी : पांचगणी शहरातील विविध भागात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. प्राण्यांबद्दल दयेचा भाग योग्य आहे. परंतु ही कुत्री लोकांच्या, लहान मुलांच्या अंगावर धावतात. त्यामुळे अनेकांना गंभीर स्वरूपाची ईजा होते. कुत्र्यांप्रमाणे लोकांना, बालकांचा जीवही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे यासंदर्भात महापालिकेचे कायद्यानुसार योग्य ती कार्यवाही करणे गरजेचे आहे.

मोकाट कुत्र्यांच्या सुळसुळाटाने त्रस्त झाले आहेत. रात्रभर भुंकणे आणि दिवसा वाहनधारकांच्या मागे धावणे, पादचाऱ्यांवर गुरगुरणे या त्यांच्या दिनक्रमामुळे नागरिक हतबल झाले असून ,शहर व  ग्रामपंचायत प्रशासन आणि पशुवैद्यकीय विभागाने या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी त्रस्त नागरिकांमधून होत आहे. पांचगणी  येथे मोकाट कुत्री हा एक गंभीर प्रश्न बनला आहे. दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दरम्यानच्या काळात नागरिकांवर हल्ले करण्यापर्यंत मोकाट कुत्र्यांची मजल गेली आहे.
जसे पांचगणी शॉपिंग सेंटर मध्ये 
पर्यटक याना येऊन न देणे बँक समोर लोकांना भीती निर्माण झाली आहै,
टेबलटॉप रोड वरील शाळे ची मुले जात असताना तिथे कुत्र्यांची गँग बसली असत्या तर रात्री पांचगणी शहर मध्ये बसले असतात.
विशेष म्हणजे ही सर्व कुत्री एकत्र समूहाने राहतात. या समूहांनी स्वत:च्या हद्दी बनविलेल्या असतात. एकमेकांच्या हद्दीत आलेल्या कुर्त्यांवर हे समूहाने हल्ला सुरू करतात. रात्रभर एकमेकांवर कुत्री भुंकत असल्याने नागरिकांची झोप उडविण्याचे काम करतात, तर दिवसा पादचाऱ्यांना त्रस्त करतात. सुमारे 20 ते 25 कुत्री बाजारपेठेपासून ते मेन आळीपर्यंत वावरत असल्याचे चित्र आहे. वाहन, नागरिक किंवा अन्य कुत्रे दिसले की, ते अचानक हल्ला चढवितात. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. कळपाने फिरणाऱ्या मोकाट कुर्त्यांमुळे घराबाहेर पडणेही धोक्याचे झाले असल्याने प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण, कृषी, कायदा आणि सुव्यवस्था याबाबतही प्रशासनात जागरुकता आली आहे. पण, सामान्य जनतेला भेडसावणार्या मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ना शासनातर्फे फारसे प्रयत्न होताना दिसत, ना त्यांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाकडे ठोस योजना आहे.
कुत्र्यांना मानवाच्या हालचालींचा अंदाज उपजतच असतो. कुणी दगड मारेल, काठी उगारेल अथवा शिकार करेल, अशी शंका येताच, एकतर कुत्री पळतात किंवा हिंस्र होऊन संबंधिताचा चावा घेतात. धार्मिक स्थळं, हॉटेल्स, उकिरडे, स्मशानघाट, बाजार,
या ठिकाणी कुत्र्यांची संख्या आणि पैदास मोठ्या प्रमाणात आढळते. खाण्यासाठी अन्न सहजगत्या उपलब्ध होत असल्याने या ठिकाणी कुत्र्यांचा वावर वाढतो. आधी प्रेमासाठी भुकेली असलेली हीच कुत्री पुढे हिंसक होतात.
 
अन्न न मिळाल्याने ती रोगट होतात, त्यांना खरूज होते आणि पुढे आपसी संघर्षात जखमी झाल्याने त्यांना जखमाही होतात. कुत्र्यांच्या या जखमादेखील माणसांसाठी योग्य नाहीत. एकीकडे आपण मानवी रक्ताला चटावलेल्या वाघाला ठार मारण्याची परवानगी देतो, तद्वत मानवी रक्ताला चटावलेल्या हिंस्र आणि पिसाळलेल्या कुत्र्यांना ठार मारण्याची परवानगी नाही. 
कुत्रे कितीही पिसाळले, त्यांनी कितीही लोकांना चावे घेतले, तरी त्यांना ठार मारण्यास कायद्यानेच मज्जाव केलेला आहे. 1994 पर्यंत कुत्रे मारून भटक्या कुत्र्यांवर प्रतिबंध घातला जात असे. पण, 1994-95 नंतर न्यायालयाने त्यावर बंदी घातली. नंतर निर्बिजीकरण करून कुत्र्यांना पुन्हा त्यांच्या मूळ अधिवासात सोडले जाऊ लागले. पण, यातूनही या समस्यवेर तोडगा निघाला नाही.
सातत्याने निर्बिजीकरण शस्त्रक्रिया शासकीय योजनेंतर्गत झाल्यास कुत्र्यांच्या संख्येवर आणि त्यांच्यामुळे भेडसावणार्या समस्यांवर नियंत्रण येईल, एवढे निश्चित!

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला