चोराडेत खंडोबा यात्रेनिमित्त भव्य ओपन बैलगाडा शर्यतीचा मा.सारंग पाटील यांच्या हस्ते शुभारंभ.


            चोराडे :  ता. खटाव येथे श्री खंडोबा यात्रेनिमित्त आज बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते परंतू कोणत्यातरी समाज कंटकांने उपविभागीय अधिकारींसह पंचायत समिती, औंध पोलीस स्टेशन येथे दिशाभूल करत राजकिय द्वेषापोटी हरकत घेत परवानगी रद्द करण्याची मागणी केली होती.परंतू सदरच्या फाटीवर आजतागायत ८ ते १० च्या आसपास शर्यती भरवण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये एकही अनुचित प्रकार घडला नाही याची दखल घेत मा.उपविभागीय अधिकारी यांनी अटी शर्ती लागू करून परवानगी दिली आहे.अशी माहिती आयोजक कमिटीने दिली आहे मैदान प्रवेश फि १०००/- रू आहे. प्रथम क्रमांक साठी ९१ हजार रुपये, ढाल व बकरा, द्वितीय क्रमांकासाठी ६१ हजार, ढाल व बकरा, तृतीय क्रमांक ५१ हजार व ढाल, चौथ्या क्रमांकासाठी ३१ हजार व ढाल, पाचव्या क्रमांकासाठी २१ हजार व ढाल तसेच सहावा क्रमांक ११ हजार व ढाल,  सातव्या क्रमांकासाठी ७ हजार व ढाल अशी बक्षिसे आहेत. जास्तीत जास्त संख्येने बैलगाडा मालक चालकांनी या मैदानाचा लाभ घ्यावा कोणत्याही अफ़वाना बळी पडू नका परवानगी मिळाली आहे. त्यामुळे चोराडे मैदान सुरू झाले आहे.
                 बैलगाडा शर्यतीचा  मा.सारंग बाबा पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.आयोजक सुहास दादा मित्र परिवार चोराडे, विशेष सहकार्य - पैलवान ग्रुप, नंद्या ग्रुप १५५५, बापुशेठ पिसाळ, सुधाकर कुंभार युवा मंच चोराडे दोस्ती ग्रुप जिवा, शुटर फॅन्स क्लब.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला