'रयत'च्या जनरल बॉडी सदस्यपदी सारंग पाटील यांची निवड

Selection of Sarang Patil as general body member of 'Rayat'

सातारा  : शिक्षण क्षेत्रात सर्वात मोठ्या असलेल्या रयत शिक्षण संस्थेचे कराड जनरल बॉडी सदस्य म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या आय. टी. सेलचे प्रदेशाध्यक्ष व सनबीम शिक्षण समूहाचे अध्यक्ष सारंग श्रीनिवास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मॅनेजिंग कौन्सिलच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. याबाबतच्या निर्णयाचे पत्र खासदार शरद पवार यांनी सारंग पाटील यांना पाठवून अभिनंदन केले आहे. पवार यांनी म्हटले आहे, रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलच्या बैठकीत आपली रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य (फेलो) म्हणून निवड झाली आहे. त्याबद्दल मी आपले व्यक्तिशः व संस्थेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण दिलेले' - न मी ८, योगदान महत्त्वपूर्ण असेच आहे. आपल्या सामाजिक आणि शैक्षणिकन्त क्षेत्रातील योगदानाचा फायदा रयत शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना निश्चितपणे होईल हा विश्वास आहे.।सारंग पाटील हे सनबीम शिक्षण • समूहाच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत.. याशिवाय श्रीनिवास पाटील फाउंडेशनच्या विविध उपक्रम राबवून त्यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्यात योगदान असते. संगणक साक्षरतेसाठी त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.विश्वासास पात्र राहू कर्मवीर अण्णांच्या पुढाकाराने शिक्षणाची गंगोत्री ग्रामीण भागापर्यंत व गरीबापर्यंत पोचावी, यासाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली आहे. त्यांच्या आदर्श तत्वानुसार संस्थेच्या कार्यात योगदान दे णार आहे. त्यासाठी खासदार शरद पवार यांनी दाखवलेल्या विश्वासास पात्र राहू • सारंग पाटील -

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त