पालिकेकडून सरसकट घरपट्टी आकारणी करून नागरिकांवर अन्याय ...आ . शिवेंद्रराजे भोसले
प्रकाश शिंदे - Fri 13th Oct 2023 02:57 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा पालिका हद्दवाढीमध्ये समाविष्ट झालेल्या शाहूनगर- गोडोली परिसरातील त्रिशंकू भाग, शाहूपुरी येथील नागरिकांना घरपट्टी भरण्याबाबत नगर पालिकेने नोटीस बजावली आहे. दरम्यान, पालिकेने सरसकट आकारणी करून नागरिकांवर अन्याय केला आहे. काही नागरिकांची मातीची घरे आहेत, काहींची पत्र्याची आहेत, अशा नागरिकांनाही वाढीव घरपट्टी आकारली आहे. यासंदर्भात आज पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्यासोबत आ . शिवेंद्रराजे भोसले यांनी बैठक घेतली.
नागरिकांना वाढीव घरपट्टी भरण्याची सक्ती न करता, भागनिहाय पाहणी करून जसे घर असेल त्या निकषानुसार मोजमाप घेऊन घरपट्टी आकरण्याच्या सूचना आ . शिवेंद्रराजे यांनी पालिका प्रशासनाला केल्या. याबाबत तातडीने कार्यवाही करण्यास सांगितले. मुख्याधिकारी बापट यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन भागनिहाय पाहणी करून, नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करण्याचे आश्वासन यावेळी दिले. याप्रसंगी नगर विकास आघाडीचे सर्व आजी- माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#shivendraraje
@sataranagarpalika
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Fri 13th Oct 2023 02:57 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Fri 13th Oct 2023 02:57 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Fri 13th Oct 2023 02:57 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Fri 13th Oct 2023 02:57 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Fri 13th Oct 2023 02:57 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Fri 13th Oct 2023 02:57 pm
संबंधित बातम्या
-
फलटण शहर व तालुक्यातील निवासी अतिक्रमणे नियमित करणार.मा . खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर
- Fri 13th Oct 2023 02:57 pm
-
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Fri 13th Oct 2023 02:57 pm
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मा.खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट..
- Fri 13th Oct 2023 02:57 pm
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Fri 13th Oct 2023 02:57 pm
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Fri 13th Oct 2023 02:57 pm
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Fri 13th Oct 2023 02:57 pm
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Fri 13th Oct 2023 02:57 pm
-
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Fri 13th Oct 2023 02:57 pm













