जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन सेनेचे आमरण उपोषण सुरू

सातारा :  हे गमेवाडी ता. कराड येथील सरपंच सविता रामचंद्र ढवळे व सदस्य यांना जातीवादी मानसिकतेतुन जाणीवपूर्वक पद रद्द करण्याकरीता राजकीय षडयंत्र रचणाऱ्या ग्रामसेवक प्रशांत सदाशिव कारंडे, उपसरपंच वसंत पांडुरंग जाधव यांना निलंबित करुन कठोर कारवाई करावी. अशी मागणी करूनही अद्याप कार्यवाही झाली नाही.म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन सेनेतर्फे आमरण उपोषण जिल्हाध्यक्ष विशाल भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरू असल्याची माहिती रमेश गायकवाड यांनी दिली. मागासवर्गीय प्रवर्गातून सरपंच म्हणुन सविता ढवळे व त्यांची आई सौ. बाळकाबाई ढवळे या गावातील एकाच कुटुंबातील व्यक्ती निवडणुकीत बिनविरोध निवडुण आल्या होत्या.गावात इतर मागासवर्गीय प्रवर्गाचे एकच कुटुंब वास्तव्यास आहे. या गावातील आलेल्या इतर सदस्यांनी वय वर्षे ७५ असणाऱ्या सौ. बाळकाबाई ढवळे यांना सरपंच बनविण्याचा कुटील डाव आकला होता. परंतु त्यांचे वय पाहता त्यांची मुलगी सविता ढवळे यांना प्रशासनाने अनुमोदक आई तर सुचक स्वतः प्रशासन होऊन सरपंचपदी निवड करण्यात आली. याचाच मनात राग धरुन सर्व सदस्य उपसरपंच वसंत पांडुरंग जाधव व ग्रामसेवक प्रशांत कारंडे यांनी जाणीवपूर्वक जातीय द्वेषातुन ओ.बी.सी. महिला सरपंच असल्याने जाणीवपूर्वक राजकीय डावपेच टाकून त्रास देण्याचे काम चालु केले आहे. यामध्ये सदर कारभार मनमानी करुन न झालेल्या कामाचे चेक पुर्ण झाले असल्याचे दाखवत गैरव्यवहार करीत आहेत. मुंबई ग्रामपंचायत अधिनियमांचे उल्लंघन करुन सरपंच सविता ढवळे यांच्या परस्पर बेकायदेशीर व्यवहार व कारभार चालवत आहेत. तसेच त्या कुटुंबीयांना मंजुर झालेले घरकुल काम चालु असताना अडथळे अणुन ते बंद पाडण्यात आले आहे.त्यांचे वडिल ९२hi वर्षाचे असल्याने रामचंद्र तुकाराम ढवळे यांना कारण नसताना खोटे नाट्य राजकीय हेतुने तक्रारी करुन कोर्टाच्या पायऱ्या झिजविण्यास भाग पाडले आहे. याचा जाब विचारता   करुन जाती वाचक शिवीगाळ, दमदाटी, अंगावर येणे असे प्रकार सातत्याने ग्रामसेवक, उपसरपंच करत असुन हे मानवतेला काळिंबा फासणारे कृत्य चालु आहे. अश्या जातीवादी मानसिकतेत काम करणाऱ्या ग्रामसेवक व उपसरपंच यांना निलंबित करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.अशा आशयाची मागणी पालकमंत्री यांच्यासह मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, खा. श्रीनिवास पाटील, उप मुख्यकार्यकारी अधिकारीधिरी (ग्रा.प.) आदींना प्रति देण्यात आलेल्या आहेत

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला