आजचे राशि भविष्य आणी पंचाग २९ ऑक्टबर २०२२

आजचा शुभ मुहूर्त २९ ऑगस्ट २०२२ : ब्रह्म मुहूर्त सकाळी ०४ वाजून २८ मिनिट ते ०५ वाजून १३ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी ०२ वाजून ३० मिनिट ते ०३ वाजून २१ मिनिटांपर्यंत. निशीथ काल मध्यरात्री १२ ते १२ वाजून ४४ मिनिटांपर्यंत. गोधूलि बेला संध्याकाळी ०६ वाजून ३३ मिनिट ते ०६ वाजून ५७ मिनिटांपर्यंत. अमृत काळ ०३ वाजून ३२ मिनिट ते ०५ वाजून १२ मिनिटांपर्यंत

सोमवार २९ ॲागस्ट २०२२, भारतीय सौर ७ भाद्रपद शके १९४४, भाद्रपद शुक्ल द्वितीया दुपारी ३-२० पर्यंत, चंद्रनक्षत्र: उत्तरा फाल्गुनी रात्री ११-० ३ पर्यंत, चंद्रराशी: कन्या, सूर्यनक्षत्र: मघा. राहूकाळ संध्याकाळी ०७ वाजून ३० मिनिट ते ०९ वाजेपर्यंत.

सोमवार, २९ ऑगस्ट २०२२
{ आज ज्यांचे वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद }

मेष
आजच्या दिवशी काही शारीरिक, मानसिक अस्थैर्य जाणवेल. आरोग्याच्या अनेक तक्रारी डोके वर काढतील. त्यांच्याकडे मुळेच दुर्लक्ष करून चालणार नाही.

वृषभ
आजचा दिवस उत्साहाचा, आनंदाचा असेल. आपल्यातील कलागुण, आवडीनिवडी, छंद यांना प्रोत्साहन मिळेल. काही नवीन कलाविष्कार सादर कराल.

मिथुन
आज उत्तम गृहसौख्याचा आनंद घ्याल. काही धार्मिक व सेवाभावी संस्थांना मदत कराल. ज्येष्ठांची सेवा करून त्यांचे आशीर्वाद प्राप्त कराल. यात कुटुंबीयांचेही सहकार्य लाभेल.

कर्क
आज पराक्रमातून लाभ प्राप्तीचा आनंद घ्याल. आपल्यातील क्षमता, योग्यता, पात्रता यांचा योग्य वापर करून व आपल्या मूळ स्वभावाला अनुसरून आजच्या दिवसाचा योग्य वापर करून कार्यसिद्धी कराल.

सिंह
आजचा दिवस हा कौटुंबिक सौख्याचा असेल. कुटुंबीयांच्या इच्छेप्रमाणे वर्तन कराल. काही महत्त्वाची कामे हातावेगळी करताना कुटुंबीयांचे मत विचारात घ्या.

कन्या
आजचा दिवस आपल्यासाठी नवीन ऊर्जा व अभूतपूर्व उत्साह यांनी भरलेला असेल. आपल्या बुद्धिमत्तेचा योग्य वापर करून आजचा दिवस आनंदात व्यतीत कराल.

तुळ
आजचा दिवस काहीसा तणावयुक्त असेल. काही चिंता आज सतावतील. त्यामुळे आज कोणतेही महत्त्वपूर्ण निर्णय घेणे टाळावेत. खर्चावर नियंत्रण ठेवावे.

वृश्चिक
बऱ्याच दिवसांपासून करीत असलेले तपश्चर्या आज कामास येईल. आज लाभाची, आनंदाची प्राप्ती कराल. मात्र जे मिळालं ते योग्य पद्धतीने जपून ठेवा. आपला सहवास सर्वांना हवाहवासा वाटेल.

धनु
आज आपले संपूर्ण लक्ष आपल्या कामावर केंद्रित राहील. बऱ्याच दिवसांपासून अडकलेले काही काम पूर्ण करण्यासाठी आज प्रयत्नशील राहाल.

मकर
आज भाग्याची, नशिबाची साथ आपणास मिळेल. गेल्या अनेक दिवसांपासून आपण घेत असलेल्या मेहनतीचे, परिश्रमाचे आज चीज होईल.

कुंभ
आजच्या दिवशी अनेक अडचणी व अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. आरोग्याच्याही काही समस्या सतावतील. आज केवळ आपल्या नित्य कामावर लक्ष केंद्रित करावे.

मीन
आजच्या दिवशी उत्तम दांपत्य जीवनाचा अनुभव घ्याल. जोडीदाराचे भरभरून प्रेम व सहकार्य लाभेल. आपणही जोडीदाराला मनासारखा वेळ द्याल.

 

आजचा अशुभ मुहूर्त २९ ऑगस्ट २०२२ :

राहूकाळ ०७ वाजून ३० मिनिट ते ०९ वाजेपर्यंत. १० वाजून ३० मिनिट ते १२ वाजेपर्यंत यमगंड असेल. दुपारी ०१ वाजून ३० मिनिट ते ०३ वाजून ३० मिनिटांपर्यंत गोधुली बेला असेल. दुर्मुहूर्त काळ दुपारी १२ वाजून ४७ मिनिट ते ०१ वाजून ३९ मिनिटांपर्यंत. त्यानंतर ०३ वाजून २१ मिनिट ते ०४ वाजून १२ मिनिटांपर्यंत असेल

    सौ . कांचन थिटे 
ज्योतिष, अंक वास्तू शास्त्र प्रवीण, विवाह (m.s)

ऑनलाईन मार्गदर्शन उपलब्ध 
 संपर्क  :  9657836393 
तडवळे रोड, नवीन s.t. स्टँड जवळ, कोरेगाव, सातारा

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त