"खरं सांगायचं तर निवडणूक झालेल्या एकाही राज्यामध्ये मी गेलेलो नाही. त्यामुळे मला माहिती नाही".... शरद पवार.
Satara News Team
- Sun 3rd Dec 2023 02:54 pm
- बातमी शेयर करा
सातारा : शरद पवार आज सातारा दौऱ्यावर आहेत. ४ राज्यांच्या निवडणूक निकालांसंबंधी शरद पवार म्हणाले, ४ राज्यांपैकी ३ राज्यांच्या निवडणुकीत भाजपला अनुकूल निकाल दिसतोय. संध्याकाळपर्यंत सगळं चित्र स्पष्ट होईल.या निवडणुकीचा लोकसभेच्या निकालांवर काहीही परिणाम होणार नाही, सध्या इंडिया आघाडीसमोर मोदींना कोण पर्याय असेल, हाच विषय आमच्यासमोर आहे, असं सांगितलं
लोकसभेची सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. दुपारपर्यंतच्या कलानुसार चार राज्यांपैकी भाजपने तीन राज्यांत जोरदार मुसंडी मारली आहे. मध्य प्रदेशची सत्ता राखताना राजस्थान आणि छत्तीसगडची सत्ता काँग्रेसच्या हातून हिसकावून घेण्यात भाजपला यश आलेलं आहे. मात्र भाजपचं यश काँग्रेसला बोचलं असून हा विजय ईव्हीएमचा विजय असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. याचविषयी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले असता त्यांनी सावध पवित्रा घेतला.
मोदींची जादू आणखी आहे, असं म्हणायचं का? असा प्रश्न विचारल्यावर शरद पवार म्हणाले, मतमोजणी आणखी सुरू आहे. संध्याकाळी ६ वाजताच्या पुढे सांगता येईल.
"राजस्थानमध्ये पाच वर्ष काँग्रेसचं सरकार होतं. तिथे नवीन लोकांना सत्ता द्यावी, असा जनतेचा मूड होता. दुसरीकडे तेलंगणात सत्ताधाऱ्यांना साजेशाच मूड असतो, असं नेहमी दिसतं. पण यंदा राहुल गांधी यांची हैदरबादमध्ये सभा झाली, तिथला गर्दीचा उच्चांक बघून आम्हा लोकांची खात्री झाली की यंदा तेलंगणात सत्ताबदल होईल, असा आवर्जून उल्लेख शरद पवार यांनी केला. त्याचवेळी ३ राज्यांच्या निवडणुकीत भाजपला अनुकूल निकाल दिसत असल्याचं पवार म्हणाले.
भाजपच्या विजयानंतर काँग्रेसने ईव्हीएमचा विजय असल्याचा आरोप केला. यावर बोलताना शरद पवार म्हणाले, "याबाबतची माहिती माझ्याकडे नाही. खरी माहिती मिळेपर्यंत ईव्हीएमला दोष देणार नाही". काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजीमुळे असा निकाल लागला आहे का? असं विचारलं असता ते म्हणाले, "खरं सांगायचं तर निवडणूक झालेल्या एकाही राज्यामध्ये मी गेलेलो नाही. त्यामुळे मला माहिती नाही".
"चार राज्यांच्या निकालाचा इंडिया आघाडीवर काहीही परिणाम होणार नाही. कारण विधानसभा आणि लोकसभेचा जनतेचा मूड वेगळा असतो. निकालानंतर उद्या काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या घरी आम्ही इंडिया आघाडीची बैठक बोलावली आहे. त्याठिकाणी आम्ही या सगळ्या गोष्टींचं परिमार्जन करू", असंही शरद पवार या वेळी बोलताना सांगितलं .यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आ. शशिकांत शिंदे उपस्थित होते.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Sun 3rd Dec 2023 02:54 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Sun 3rd Dec 2023 02:54 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sun 3rd Dec 2023 02:54 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sun 3rd Dec 2023 02:54 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sun 3rd Dec 2023 02:54 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Sun 3rd Dec 2023 02:54 pm
संबंधित बातम्या
-
फलटण शहर व तालुक्यातील निवासी अतिक्रमणे नियमित करणार.मा . खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर
- Sun 3rd Dec 2023 02:54 pm
-
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Sun 3rd Dec 2023 02:54 pm
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मा.खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट..
- Sun 3rd Dec 2023 02:54 pm
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Sun 3rd Dec 2023 02:54 pm
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Sun 3rd Dec 2023 02:54 pm
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Sun 3rd Dec 2023 02:54 pm
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Sun 3rd Dec 2023 02:54 pm
-
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Sun 3rd Dec 2023 02:54 pm













