शिवथर येथे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नात बंधाऱ्याचे भूमिपूजन संपन्न
Satara News Team
- Tue 30th Jan 2024 01:24 pm
- बातमी शेयर करा
शिवथर : येथे पलानी ओढा येथे नवीन बंधाऱ्याकरिता मा. खासदार श्रीनिवास पाटील साहेब यांच्या प्रयत्नातून व माजी कृषी सभापती किरण साबळे पाटील यांच्या शिफारशीतून नवीन बंधाऱ्याचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला. सध्या सर्वत्र पर्जन्यमान कमी असल्यामुळे पाण्याची टंचाई जाणवत आहे त्यास शिवथरही अपवाद नाही याच करता ग्रामपंचायतींनी पाठपुरावा करून मा. खासदार श्री श्रीनिवास पाटील यांच्याकडून येथे नवीन बंधारा मंजूर करून घेतला आहे.या बंधाऱ्यामुळे शिवथर परिसरातील पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे तसेच गावची भूजल पातळी वाढवण्यास मदत होईल व जवळ असणाऱ्या शिवथर गावच्या पाणीपुरवठा विहिरीसाठी हा बंधारा वरदान ठरेल. या बंधाऱ्याचे भूमिपूजन शिवथर गावच्या सरपंच नशीम इनामदार यांच्या हस्ते करण्यात आला या बंधाऱ्याकरिता सतीश साबळे व योगेश साबळे पाटील यांनी आपल्या शेतीच्या बाजूची जागा बंधारा बांधकामासाठी उपलब्ध करून दिली. याबद्दल त्यांचे सर्व ग्रामस्थातून कौतुक होत आहे.यावेळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच दत्तात्रय दिनकर साबळे. माजी सरपंच नवनाथ साबळे, हेमलता साबळे सोसायटीचे चेअरमन जितेंद्र पिसाळ ग्रामपंचायत सदस्य प्रिया साबळे ,संतोष हवाळे, संतोष साबळे,अनिल साबळे सतीश साबळे, अजित साबळे,संजय साबळे व ग्राम विकास अधिकारी विलास माने आदी ग्रामस्थ उपस्थित होते
स्थानिक बातम्या
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Tue 30th Jan 2024 01:24 pm
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Tue 30th Jan 2024 01:24 pm
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Tue 30th Jan 2024 01:24 pm
नो रिअल ....हो! अगदी खरं आहे. रील च्या चक्कर मध्ये आपण रिअल राहिलो नाही.
- Tue 30th Jan 2024 01:24 pm
यशोशिखर! चि. रियांश संतोष देशमुख याचे इ. ५ वी स्कॉलरशिप व सैनिक स्कूल परीक्षेत दैदिप्यमान यश
- Tue 30th Jan 2024 01:24 pm
पॅरोलवर सुटलेला खुनातील फरार आरोपी चार वर्षांनंतर साताऱ्यात जेरबंद
- Tue 30th Jan 2024 01:24 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 30th Jan 2024 01:24 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 30th Jan 2024 01:24 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Tue 30th Jan 2024 01:24 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Tue 30th Jan 2024 01:24 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Tue 30th Jan 2024 01:24 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Tue 30th Jan 2024 01:24 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Tue 30th Jan 2024 01:24 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Tue 30th Jan 2024 01:24 pm













