रिपाईतर्फे महामेळावा मोठ्या प्रमाणावर संपन्न

पक्षप्रवेश व रॅलीचे आयोजन

सातारा: जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्यावतीने कराड येथे मंगळवार महामेळाव्याचे व रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
         रॅली मसुर ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा व सर्किट हाऊस अशी काढण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांच्या आदेशाने होवू घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने कराड दक्षिण व कराड उत्तरच्या मेळाव्यात जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सहविचार सभा संपन्न झाली.यावेळी मागासवगीय सर्व महामंडळावर अध्यक्षपद निर्माण झाली पाहिजेत.त्यामुळे तात्काळ निधी उपलब्ध करून देण्यात येईल.रमाई आवास योजना, घरकुल वाल्मिकी आवास घरकुल योजना तसेच दलित वस्ती सुधार योजना घरकुलाचे अंदाजपत्रक रक्कम वाढवण्यात यावी. विद्यार्थ्याना मिळणारी शिष्यवृत्ती हे प्रत्येक कॉलेजमध्ये ऑनलाईन रित्या भरून ते त्वरित वाटप करण्यात यावे.दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत भूमी यांना देण्यात येणारे जमीन वाटप हे पूर्वीच्या जीआर प्रमाणे करण्यात यावे. महिला वृद्ध,विधवा,परितक्त्या व  अपंग यांचे सर्वे करून प्रत्येक ग्रामपंचायत तहसीलदारमार्फत पेन्शन योजना चालू करावी.बेघर लोकांना जागा आणि जमीनसह घरकुल देण्यात यावीत.अशा अनेक मागण्यांसाठी मेळावा व रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी जिल्हा पदाधिकारी यांच्यासह कराड दक्षिणचे अध्यक्ष मुकुंद माने, कराड उत्तरचे अध्यक्ष सर्जेराव बनसोडे, कराड शहराध्यक्ष संजय कां.(मलकापूर), शहराध्यक्ष तळवळकर,अभिवादन अमर कांबळे, संतोष भिसे, वाहतूक आघाडीचे लोंदे आदी पदाधिकारी - कार्यकर्ते  उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त