"तरुण भारत" प्रतिनिधी संभाजी चव्हाण यांचे निधन
Satara News Team
- Mon 12th Dec 2022 09:59 am
- बातमी शेयर करा
नागठाणे :: "तरुण भारत"चे नागठाणे प्रतिनिधी व भरतगावचे माजी उपसरपंच संभाजी चव्हाण वय 47 यांचे सोमवरी जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना निधन झाले.
संभाजी चव्हाण हे हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. त्यांचे शिक्षण नवी मुंबई येथे झाले. त्याने मुंबईत अनेक छोटे मोठे व्यवसाय केले पण त्यांचे मन रमले ते पत्रकारितेत. उत्तम शेती हा सुद्धा त्यांचा आवडता छंद होता. पत्रकारितेसोबत त्यांनी राजकारण, समाजकारण यांतही आपला ठसा उमटवला.
चार डिसेंबर रोजी त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारासाठी वैद्यकीय यंत्रणेने प्रयत्नांची शिकस्त केली. सिव्हिल सर्जन डॉ. चव्हाण, डॉ. भोसले, डॉ. ससाणे, प्रतिभा हॉस्पिटलचे डॉ. संजय साठे यांनी अद्यावत उपचार करण्याचे प्रयत्न केले.
त्यांचावरील उपचाराची दैनंदिन माहिती पत्रकारांचे जिल्हाध्यक्ष हरिष पाटणे, सरचिटणीस दीपक प्रभावळकर, राज्य उपाध्यक्ष शरद काटकर यांच्याकडून घेतली जात होती. संभाजी चव्हाण यांचे निकटवर्तीय खासदार संजीव नाईक यांनीही या दरम्यान त्यांची भेट घेतली होती.
अखेर मृत्यूबरोबरचा संघर्ष सोमवारी पहाटे 4.15 वाजता संपला.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुले जय, वैभव, भाऊ हर्षद, प्रशांत असा परिवार आहे.
त्यांच्यावर राहत्या गावी भरतगाववाडी येथे अंत्यविधी होणार आहेत.
मृताम्यास शांती लाभो, ही ईश्वर चरणी प्रार्थना !
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Mon 12th Dec 2022 09:59 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Mon 12th Dec 2022 09:59 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Mon 12th Dec 2022 09:59 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Mon 12th Dec 2022 09:59 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Mon 12th Dec 2022 09:59 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Mon 12th Dec 2022 09:59 am
संबंधित बातम्या
-
फलटण तालुक्यात रानगव्यानंतर आता रानडुकराने केला शेतकऱ्यावर हल्ला.
- Mon 12th Dec 2022 09:59 am
-
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Mon 12th Dec 2022 09:59 am
-
फलटण येथे चायनीज मांजाने कापला गळा
- Mon 12th Dec 2022 09:59 am
-
साताऱ्यात उलटा धबधबा पाहायला गेलेली कार ३०० फूट दरीत
- Mon 12th Dec 2022 09:59 am
-
वीजेचा शॉक लागून २ वारकऱ्यांचा दुर्दैवी अंत
- Mon 12th Dec 2022 09:59 am
-
मुलीचा प्रेमविवाह; धक्क्यातून आईने जीवन संपवले
- Mon 12th Dec 2022 09:59 am
-
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली!
- Mon 12th Dec 2022 09:59 am
-
पुसेसावळी येथील युवकाने गळफास घेऊन संपवली जिवनयात्रा?.
- Mon 12th Dec 2022 09:59 am













