माळशिरस तालुक्यातील मारकर वाडी येथिल बॅलेट पेपरचीनिवडणूक प्रशासनाने रोखली.
- राजेंद्र बोंद्रे
- Wed 4th Dec 2024 03:56 pm
- बातमी शेयर करा
फलटण: संपूर्ण भारत देशाचं लक्ष असलेल्या महाराष्ट्र विधानसभा 2024 ची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. खऱ्या अर्थाने हा लोकशाहीचा उत्सव महायुती आणि महाविकास आघाडीच्या लढतीने आपापली ताकद पणाला लावून संपन्न झाला. या निवडणुकीच्या अनुषंगाने माळशिरस विधानसभा मतदारसंघ खूपच चर्चेत होता त्याचं कारण या मतदारसंघातील मोहिते-पाटील घराण्याची ताकद आणि या ताकतीला कडवा आव्हान दिलेले भाजपचे उमेदवार राम सातपुते त्याचं कारण पण असं आहे की सोलापूर जिल्ह्यातील बलाढ्य ताकद मोहिते पाटील घराणे ज्या पक्षाकडे असेल त्या पक्षाचे चांगभलं होणार हे मागील इतिहास पासून सर्वांना माहित आहेत
या अगोदर लोकसभेच्या झालेल्या निवडणुकीत भाजप पासून दूर होऊन धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या गटाकडून विजयी झाले आणि विधानसभेलाही राष्ट्रवादी शरद पवार पक्ष काँग्रेस चे उमेदवार उत्तमराव जानकर विजयी झाले. या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश प्राप्त झाले आणि महाविकास आघाडीची दाणादाण झाली. या महाराष्ट्र विधानसभा 2024 मध्ये ईव्हीएम मशीनद्वारे मतदान झाले होते महाविकास आघाडीची झालेली पिछाडी पाहता महाविकास आघाडीचे सर्व मित्र पक्षांनी ईव्हीएम मशीन द्वारे होणाऱ्या मतदानावर शंका उपस्थित केली.
माळशिरस विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झाला असला तरी मारकडवाडी या छोट्याशा गावात त्यांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा मतदान कमी मिळाले. आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी कार्यकर्त्यांना शंका उपस्थित झाली. या गावांमध्ये आपल्याला मतदान कमी मिळाले याची खात्री करण्यासाठी त्यांनी स्वतःच यंत्रणा राबवून मतपत्रिका छापून मतदान पेटी तयार करून बॅलेट पेपरवर मतदान घेऊन खात्री करण्याचा प्रयत्न केला.
पण प्रशासनाने तातडीने या प्रक्रियेची दखल घेऊन या छोट्याशा गावात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तातडीने उपाययोजना केली. गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळींना नोटीस देऊन अशा प्रकारची प्रक्रिया राबवता येणार नाही. जर काही अशांतता निर्माण झाली वाद निर्माण झाला तर आम्हास आपणावर कायदेशीर कारवाई करावी लागेल याची जाणीव करून दिली आणि ही प्रक्रिया थांबवण्यात आली.
स्थानिक बातम्या
सातारा जिल्ह्यातून कोणाला लाल दिव्याची गाडी मिळणार ?
- Wed 4th Dec 2024 03:56 pm
शरदचंद्र पवार इन्स्पायर फेलोशिप विजयकुमार भुजबळ यांची निवड..
- Wed 4th Dec 2024 03:56 pm
मारहाण प्रकारात 20 जणांवर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- Wed 4th Dec 2024 03:56 pm
संबंधित बातम्या
-
सातारा जिल्ह्यातून कोणाला लाल दिव्याची गाडी मिळणार ?
- Wed 4th Dec 2024 03:56 pm
-
कोरेगावातील १८ ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची तपासणी करता शशिकांत शिंदेंनी भरले 8.5 लाख रुपये
- Wed 4th Dec 2024 03:56 pm
-
विधानसभा निवडणुक प्रक्रियेची चौकशी व्हावी
- Wed 4th Dec 2024 03:56 pm
-
आगामी काळात गोरे बंधू दिसणार विधान भवनात?
- Wed 4th Dec 2024 03:56 pm
-
मनोजदादा तुम्ही तर जाईंट किलर
- Wed 4th Dec 2024 03:56 pm
-
आठ आमदारांपैकी दोन मंत्रिपद कोणाकोणाच्या गळ्यात पडणार
- Wed 4th Dec 2024 03:56 pm