माती परीक्षण करूनच खतांचा संतुलित वापर करावा - श्री बेलदार

 वाई : खतांचा बेसुमार वापर व त्यामुळे बि.घडत असलेला जमिनीचा पोत यावर मात करण्यासाठी तसेच आपली शेतजमीन भविष्यात सुस्थितीत राहण्यासाठी माती परीक्षण करूनच खतांचा वापर करावा असे आवाहन श्री.रवींद्र बेलदार मंडळ कृषी अधिकारी वाई यांनी केले,जागतिक मृदा दिन निमित्त नागेवाडी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
  यावेळी त्यांनी माती परीक्षण अहवालानुसार नुसार खते कशी द्यावीत याचेही मार्गदर्शन केले.श्री.तानाजी यमगर कृषि पर्यवेक्षक यांनी माती परीक्षण महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. कृषि सहाय्यक ललिता बोडके यांनी माती नमुना कसा घ्यावा याचे मार्गदर्शन केले.
   यावेळी जमीन आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात आले.तसेच परस बागेतील भाजीपाला किट चे ही वाटप  करण्यात आले.कार्यक्रमास उपसरपंच सौ आशा जाधव,श्री मारुती जाधव सोसायटी चेअरमन , सर्व ग्रामपंचायत सदस्य ,कृषी सहाय्यक श्री निखिल मोरे,श्री विलास भुसारे,श्रीमती वंदना आढळ तसेच नागेवाडी गावातील शेतकरी उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त